भारतीय जोडप्याने केली अर्धा टन कोकेनची तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 06:27 AM2024-01-31T06:27:17+5:302024-01-31T06:27:32+5:30
Smuggling: ब्रिटनमधील एका भारतीय वंशाच्या जोडप्याला ऑस्ट्रेलियात अर्ध्या टनापेक्षा जास्त कोकेन तस्करी केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. भारताने या जोडप्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती.
लंडन - ब्रिटनमधील एका भारतीय वंशाच्या जोडप्याला ऑस्ट्रेलियात अर्ध्या टनापेक्षा जास्त कोकेन तस्करी केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. भारताने या जोडप्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती.
या जाेडगोळीने लोखंडी टूलबॉक्सच्या अवरणाखाली कोकेन लपवून विमानाने पाठवली होती. ऑस्ट्रेलियन सीमा दलाने मे २०२१ मध्ये सिडनी येथे ५७ दशलक्ष पौंड किमतीचे कोकेन पकडल्यानंतर, हॅनवेल येथील आरती धीर (५९) आणि कवलजीतसिंह रायजादा (३५) राष्ट्रीय गुन्हे तपास यंत्रणेच्या (एनसीए) रडारवर आले. साउथवॉर्क क्राउन कोर्टात सोमवारी झालेल्या खटल्यानंतर ज्युरीने त्यांना अंमली पदार्थांच्या १२ आणि मनी लाँड्रिंगच्या १८ प्रकरणांत दोषी ठरवले.