सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ अन् फोटो लीक झाल्यानंतर बाबर आझमचे पहिले ट्विट; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:56 PM2023-01-17T12:56:36+5:302023-01-17T13:00:02+5:30
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमचा एक एमएमएस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मैदानातील खराब कामगिरीमुळे बाबरचं कर्णधारपद धोक्यात होते. आता मैदानाबाहेरही बाबर आझमच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
बाबर आझमचा एक एमएमएस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो अश्लील अवस्थेत दिसत आहे. बाबर आझमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याने आपल्याच संघातील सहकारी खेळाडूच्या प्रेयसीसोबत अश्लील वर्तन केल्याचे सांगण्यात येत आहे.
बाबर आझम पाकिस्तानी संघाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, कर्णधार बाबर आझमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याला पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बाबर विचित्र अवस्थेत दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याने आपल्याच सहकारी खेळाडूच्या प्रेयसीसोबत असे अश्लील कृत्य केले आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
Babar Azam sexting with gf of another Pakistan cricketer and promising her that her bf won’t be out of team if she keeps sexting with him is just 👎🏿
— Dr Nimo Yadav (@niiravmodi) January 15, 2023
I hope allah is watching all this .
pic.twitter.com/nlKEp55dUB
सदर व्हिडिओ समोर आल्यानंतर बाबर आझम याने एक ट्विट केलं आहे. यामध्ये ''आनंदी होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही'', असं म्हणत त्याचा फोटोही पोस्ट केला आहे.
Doesn't take too much to be happy ☺️ pic.twitter.com/udKmZTHl6V
— Babar Azam (@babarazam258) January 16, 2023
काही महिन्यांपूर्वी एका महिलेने बाबर आझमवर लग्नाच्या बहाण्याने १० वर्षे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. बाबरवर गंभीर आरोप करताना संबंधित महिलेने सांगितले होते की, मी गरोदर राहिल्यावर बाबरने मला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सतत अडचणीत येत आहे. मायदेशात एकदिवसीय आणि कसोटी मालिका गमावल्यानंतर आता त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष नजम सेठी आणि मॅनेजमेंट लवकरच बाबरला तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून हटवू शकते, असे म्हटले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"