तासभर राहिला अॅनाकोंडाच्या पोटात!
By admin | Published: December 9, 2014 03:17 AM2014-12-09T03:17:29+5:302014-12-09T08:49:18+5:30
अॅमेझॉनचे जंगल नष्ट होऊ नये, याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अमेरिकेतील निसर्गतज्ज्ञ पॉल रोसोली यांनी अंगावर काटा येईल असा स्टंट केला.
Next
स्टंट : अमेरिकेतील निसर्गतज्ज्ञाचे साहस
न्यूयॉर्क : अॅमेझॉनचे जंगल नष्ट होऊ नये, याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अमेरिकेतील निसर्गतज्ज्ञ पॉल रोसोली यांनी अंगावर काटा येईल असा स्टंट केला. पॉल यांनी अॅनाकोंडा या जगातील महाकाय सर्पाच्या पुढय़ात स्वत:ला आयते भक्ष म्हणून पेश केले. त्यानंतर जे घडले ते अतर्क्य आणि चित्तथरारक ठरले. अॅनाकोंडा पॉलना गिळत असताना प्रत्येक क्षणाचे चित्रण करण्यात आले आहे. आश्चर्य म्हणजे ही मादी अॅनाकोंडा आणि पॉल हे दोघेही सुखरूप असल्याचे नंतर जाहीर करण्यात आले.
अॅनाकोंडा हा सर्प प्रजातीतील सर्वात महाकाय जीव. गिळताना अॅनाकोंडा भक्षाला गुदमरवून टाकतात, पण रोसोली जिवंत राहिले. आणि आता जगातील लोकांना अॅनाकोंडाच्या पोटात जातानाचा त्यांचा प्रवास पाहणो शक्य आहे.
रविवारी रात्री या साहसाला सुरुवात झाली. अमेरिकेत डिस्कव्हरी वाहिनीवर त्याचे थेट चित्रण करण्यात आले. आफ्रि केतील पावसाळी जंगलात 1क् वर्षे काम केल्यानंतर पॉलना ही कल्पना सुचली. पावसाळी जंगले नष्ट होत आहेत, या वास्तवाकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे साहस केले.
़़़अन् त्याने गिळले
मृत्यू येण्याचा
धोका पत्करून अॅनाकोंडाच्या पोटात जीव गुदमरू नये म्हणून पॉल यांनी खास तयार केलेला कार्बन फायबर सूट घातला होता. या सूटमध्ये श्वासासाठीची सोय होती.
अॅनाकोंडाच्या पोटात गेल्यानंतर मी जिवंत राहीन की नाही, याबद्दल मला खात्री नव्हती; पण मी गुदमरणार नाही हे मात्र नक्की होते. मी तिच्या पुढय़ात गेलो तेव्हा तिने लगेच मला गिळले नाही.
मी थोडेसे छेडले, तेव्हा स्वत:चा बचावासाठी तिने मला गिळले. पॉल तब्बल तासभर तिच्या पोटात होते. तिथून त्यांची सुटका कशी झाली
याचा तपशील अजून गुलदस्त्यात ठेवला आहे.