अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 06:06 AM2024-06-02T06:06:33+5:302024-06-02T06:07:08+5:30

शहरातील सर्व गिफ्ट शॉप आणि रेस्टॉरंट पाहुण्यांसाठी केले बुक, जगभरातील ८०० सेलिब्रिटींची उपस्थिती 

Anant Ambani-Radhika Merchant's pre-wedding celebration in Italy | अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन

पोर्टोफिनो (इटली) : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपु्त्र अनंत अंबानी हे राधिका मर्चंट यांच्यासोबत मुंबईत १२ जुलै रोजी विवाहबद्ध होत आहेत. या दोघांच्या दुसऱ्या प्री वेडिंगचे जोरदार सेलिब्रेशन इटलीमध्ये सुरू आहे. अखेरच्या दिवसाच्या सेलिब्रेशनसाठी शनिवारी ८०० हून अधिक सेलिब्रेटी इटलीतील पोर्ट सिटी पोर्टोफिनोमध्ये दाखल झाले. 

या कार्यक्रमाला ‘ला डोल्ले व्हिटा’ असे नाव दिले आहे. या इटालियन शब्दाचा अर्थ ‘गोड जगणे’ असा होतो. या कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी पोर्ट सिटीमधील सर्व २४ गिफ्ट शॉप आणि रेस्टॉरंट्स  बुक करण्यात आली आहेत. कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांखेरीज इथे अन्य कुणालाही प्रवेश करण्याची मुभा असणार नाही. येणाऱ्या पाहुण्यांना खास एक बॅग दिली जाणार आहे. याच्याच आधारे त्यांना शहरात प्रवेश दिला जाणार आहे. (वृत्तसंस्था) 

गायक आंद्रेया बोसिलेई यांचा खास परफॉर्मन्स
प्रख्यात गायक आंद्रेया बोसिलेई आणि जगप्रसिद्ध व्हायोलनिस्ट अनास्तासिया पेट्रीशाक यांचाही खास परफॉर्मन्स सादर होणार आहे. स्थानिक नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. 
मोठेमोठे स्पिकर्स लावले असल्याने स्थानिक नागरिकांना हे सादरीकरण केवळ ऐकता येणार आहे. दुसऱ्या प्री-वेडिंग कार्यक्रमाच्या समारोपासाठी  पोर्टोफिनोमध्ये ग्रँड डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमंतांचे शहर अशी या शहराची ओळख आहे. 

कॅटी पेरीच्या गाण्यावर थिरकले सर्व पाहुणे
अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये शुक्रवारी जगप्रसिद्ध अमेरिकन गायिका कॅटी पेरीने परफॉर्मन्स केला. फ्रान्स येथील कान्समध्ये कॅटी पेरीचा रॉकिंग परफॉर्मन्स झाला.
याचे व्हिडीओ समोर आले आहेत. कॅटी पेरीच्या गाण्यावर पाहुणे जबरदस्त नाचताना पाहायला मिळत आहेत. या परफॉर्मन्ससाठी अंबानींनी कॅटी पेरीला कोट्यवधी मानधन दिले आहे.

ओरीला उचलून नाचू लागला रणवीर सिंग
या पार्टीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात गुरू रंधावा स्टेजवर ‘आज फिर किथे चली है मोरनी बन के’ हे गाणे गात आहे. त्यावर अभिनेता रणवीर सिंग, वीर पहाडिया आणि ओरी नाचत आहेत. नाचताना रणवीर सिंग ओरीला उचलून घेतल्याचे दिसत आहे. इटली-फ्रान्सदरम्यान समुद्रात असेंट क्रूझवर पार्टी तीन दिवस चालली. 

Web Title: Anant Ambani-Radhika Merchant's pre-wedding celebration in Italy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.