.....आणि विवस्त्र होऊन कर्मचारी पोहोचले ऑफिसला
By Admin | Published: June 30, 2016 10:19 PM2016-06-30T22:19:18+5:302016-07-01T01:37:03+5:30
कपडे काढून काम करा. अलेक्झांडर यांनी ‘डेवलप’ या शब्दाऐवजी ‘अनड्रेस’ हा शब्द वापरतात. आणि अगदी राष्ट्रपतींचा शब्द मानून लोक त्याप्रमाणे वागायला लागतात.
ऑनलाइन लोकमत
मिन्स्क, दि. ३० – बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांनी राजधानी मिन्स्कमधल्या नॅशनल असेंबलीमध्ये भाषण दिले. यावेळी अलेक्झांडर यांनी लोकांना उद्देशून बोलताना 'आपल्याला आयटी टेक्नॉलॉजीमध्ये नावीन्यपूर्णता आणायची आहे, हे स्पष्ट आहे. आयटी क्षेत्र आपण आधीच काबीज केलं आहे. त्यामुळे आपण कपडे काढून काम केलं पाहिजे," असं म्हटलं आहे. राष्ट्रपतींना स्वतःला विकसित करा "develop themselves" असं म्हणायचं होतं. मात्र त्यांनी त्याऐवजी 'गेट अनड्रेस' म्हणजेच कपडे काढून काम करा, अशा शब्दांचा उच्चार केला. राष्ट्रपतींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी कपडे काढून कामावर जाणं पसंत केलं. काही कर्मचारी तर चक्क विवस्त्र होऊन कामावरती आले. त्यांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. राष्ट्रपतींच्या आदेशाचे पालन करताना कर्मचाऱ्यांनी चक्क कपडे काढून काम केलं, यामध्ये स्त्री आणि पुरुष कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या घटनेचा सध्या सोशल मीडियावर टॉप ट्रेंड सुरू आहे.
How many points required to immigrate?
— Kafir Kebabi ن (@Aus_istan) June 30, 2016
Belarusians strip naked after accidental order from their president https://t.co/WN8s64iYsH