अँड ऑस्कर गोज टू.. लिओनार्डो दि कॅप्रिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2016 06:34 AM2016-02-29T06:34:22+5:302016-02-29T10:45:25+5:30

तब्बल सहावेला हुलकावणी दिल्यानंतर लिओनार्डो दि कॅप्रिओला या वर्षी दि रेव्हनंटसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

And Oscar Goes Too .. Leonardo Di Caprio | अँड ऑस्कर गोज टू.. लिओनार्डो दि कॅप्रिओ

अँड ऑस्कर गोज टू.. लिओनार्डो दि कॅप्रिओ

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. २९ - तब्बल सहावेला हुलकावणी दिल्यानंतर लिओनार्डो दि कॅप्रिओला या वर्षी दि रेव्हनंटसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. हॉलिवूडमध्ये अतिशय मानाचा समजल्या जाणा-या 'ऑस्कर' वितरण सोहळ्यास सुरूवात झाली.
कॅलिफोर्नियातील हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये अतिशय प्रतिष्ठेचा असा ८८ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा सुरु आहे. 'दि  डॅनिश गर्ल' या चित्रपटातील भूमिकेसाठी अॅलिसिया विकॅन्डर हिने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला असून तब्बल सहावेळा नॉमिनेशन मिळूनही पुरस्काराने हुलकावणी दिलेला, सर्वांचा हार्टथ्रॉब ' लिओनार्डो दि कॅप्रिओ'ला या वर्षी तरी ऑस्कर मिळतो का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
 
भारतीयांसाठी या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा.. 'दि क्वांटिको' या मालिकेतून हॉलिवूडमध्ये पाय रोवणा-या प्रियांकाच्या हस्ते यावर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. क्रिम कलरच्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवतरलेल्या प्रियांकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. 
 
या सोहळ्यासाठी अॅडम मके, जॉर्ज मिलर, लिओनार्दो डीकॅप्रिओ, एडी रेडमेन, सेआर्यस रोनन, ब्री लार्सन, जेनिफर लॉरेन्स, रोनी मारासारख्या अनेक दिग्गजांचे रेड कार्पेटवर आगमन झाले आहे. नामांकन मिळालेल्या द बिग शॉट, ब्रिज ऑफ स्पाईज, ब्रुकलिन, मॅड मॅक्स: फ्युरी रोड, द मार्शन, द रेवेनंट, रुम आणि स्पॉटलाइट या चित्रपटांपैकी कोणास ऑस्कर मिळेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
 
ऑस्कर २०१६ पुरस्कार पुढीलप्रमाणे - 
 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अलेजांद्रो इनार्नितू ( द रेव्हनंट) 
सर्वोत्कृष्ट अभिनेता - लिओनार्डो डी कॅप्रियो (द रेव्हनंट)
सर्वोत्कृष्ट चित्रपट - स्पॉटलाईट 
सर्वोत्कृष्ट पटकथा : स्पॉटलाईट (जॉश सिंगर आणि टॉम मॅकार्थी)
सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा : द बिग शॉर्ट (चार्ल्स रॅन्डॉल्फ आणि अॅडम मॅके)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - अलिसिया विकॅन्डर (द डॅनिश गर्ल) 
सर्वोत्कृष्ट वेशभूषा - जेनी बिवन (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन - कॉलिन गिब्सन, लिसा थॉम्प्सन (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाईल - लेस्ली वेंडरवॉल्ट (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - डि रेव्हनंट
सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग - मार्क मँगिनी आणि डेव्हिड व्हाईट (मॅड मॅक्स , फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टस - एक्स मकिना
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : मार्क रायलन्स ( ब्रिज ऑफ स्पाईज)
सर्वोत्कृष्ट संकलन - मार्गारेट सिक्सेल (मॅड मॅक्स, फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म - इनसाईड आऊट
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - बिअर स्टोरी 
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर (मूळ संगीत) - एनीयो मॉरिकोनी (द हेटफुल एट)
सर्वोत्कृष्ट मूळ गीत - रायटिंग्ज ऑन द वॉल
 
 
अॅलिशिया विकॅन्ड - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ( दि डॅनिश गर्ल) 
 
 
मार्क रायलन्स- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (ब्रिज ऑफ स्पाईस)
 
 
मॅड मॅक्स, फ्युरी रोड चित्रपटासाठी मार्गारेट सिक्सेलला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार प्रदान करताना प्रियांका
 
 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळालेला लिओनार्डो दि कॅप्रिओ आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन मिळालेली केट विन्सेट
 
 
 
 
 

 

Web Title: And Oscar Goes Too .. Leonardo Di Caprio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.