आणि ट्रम्प मोदींना म्हणाले सच्च्या दोस्ताची वाट पाहतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2017 05:50 AM2017-06-25T05:50:01+5:302017-06-25T05:50:01+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशाच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांनी पोर्तुगालला भेट दिली आहे. त्यानंतर ते आज अमेरिकासाठी रवाना झाले आहेत.

And Trump told Modi to wait for the true friendship | आणि ट्रम्प मोदींना म्हणाले सच्च्या दोस्ताची वाट पाहतोय

आणि ट्रम्प मोदींना म्हणाले सच्च्या दोस्ताची वाट पाहतोय

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 25 - पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशाच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांनी पोर्तुगालला भेट दिली आहे. त्यानंतर ते आज अमेरिकासाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी व्हाइट हाउसवर ट्रम्प यांची सोमवारी पहिल्यांदा भेट घेतील. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या स्वागताची तयारी पूर्णपणे केली आहे. मोदीच्या स्वागताचे ट्रम्प यांनी ट्विट केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांना आपला सच्चा दोस्त म्हटले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, व्हाइट हाऊसमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वगतासाठी प्रतीक्षा करीत आहे. खऱ्य़ा मित्राप्रमाणे अनेक गोष्टीवर चर्चा होणार आहे.
ट्रम्प-मोदी यांच्या भेटीदरम्यान महत्वाच्या गोष्टीवर चर्चा होणार आहे. तसेच यादरम्यान करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान भारतासाठी 22 निशस्त्र ड्रोन खरेदीच्या करारावर स्वाक्षरी करणार आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यात होणाऱ्या या कराराबाबत चर्चा झाली आहे. आता या करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान होणारा हा करार, जगाच्या दृष्टीने गेमचेंजर मानला जातो आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. त्यात ड्रोन खरेदीचा करार सर्वात महत्त्वाचा मानला जातोय. हा सौदा साधारण 130 ते 194 अरब डॉलर्सचा असणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मोदी यांची चार वेळा भेट झाली होती.

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर परदेशी पाहुण्यासाठी व्हाइट हाउसमध्ये आयोजित करण्यात येणारा हा पहिला भोजन समारंभ आहे. एच 1 बी व्हिसाचा विषय चर्चेचा भाग नसेल, असे व्हाइट हाउसने स्पष्ट केले आहे. दोन्ही नेते दहशतवाद, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरण व त्यासाठी अमेरिकेची मदत, संबंधांना बळकटी, व्यापारात वाढ यावर चर्चा करतील. त्याची माहिती निवेदनाद्वारे सर्वांना दिली जाणार आहे. ट्रम्प व मोदी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही भेटणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यानंतर नेदरलँडला जाणार आहेत. नेदरलँडमध्ये डच पंतप्रधान मार्क रट व राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेणार आहेत.

Web Title: And Trump told Modi to wait for the true friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.