अन् ती चूक झालीच, आतषबाजीनंतर बोर्ड झळकला Happy New Year 2018
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 01:49 PM2019-01-01T13:49:46+5:302019-01-01T13:50:56+5:30
सोशल मीडियावर ही चूक व्हायरल होत आहे.
सिडनी - ऑस्ट्रेलियात नवीन वर्षाचे स्वागत करताना मध्यरात्री आयोजकांकडून एक चूक झाल्याचं दिसून आलं. सोशल मीडियावर ही चूक व्हायरल होत आहे. सिडनी हार्बर ब्रीजच्या तोरणवर नववर्षाच्या स्वागतासाठी 15 लाखांपेक्षा अधिक लोकं जमा होती. त्यावेळी, आतषबाजीनंतर मोठ्या स्क्रीनवर Happy News Year 2018 असा बोर्ड झळकला.
सिडनी हार्बर ब्रीजवर करण्यात आलेल्या या आतषबाजीचे संयोजक अन्ना मैकइनर्न मंगळवारी सिडनीत पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यावेळी, आम्ही केवळ या चुकीनंतर हसू शकतो. मात्र, आमच्या म्हणण्यनुसार, अशा घटना घडत असतात. यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी 15 महिन्यांचा कालावधी लागतो, हेही विचारात घ्यायला हवं, असे अन्ना मैकइनर्न यांनी म्हटलंय. दरम्यान, ट्टविटरवर एका व्यक्तीने याची खिल्ली उडवली आहे. सिडनीच्या म्हणण्यानुसार अद्यापही 2018 च सुरू आहे. त्यामुळे मी आता घरी जाऊन झोपतो, असे ट्विट करत एकाने खिल्ली उडवली आहे.