पाकिस्तानात जमावाकडून हिंदू मंदिराची तोडफोड, जाळपोळ; जुना ढाचा उद्ध्वस्त

By कुणाल गवाणकर | Published: December 31, 2020 10:50 AM2020-12-31T10:50:01+5:302020-12-31T10:50:30+5:30

पोलिसांकडून तपास सुरू; अद्याप कोणालाही अटक नाही

Angry mob vandalises Hindu temple sets it ablaze in Pakistans Khyber Pakhtunkhwa | पाकिस्तानात जमावाकडून हिंदू मंदिराची तोडफोड, जाळपोळ; जुना ढाचा उद्ध्वस्त

पाकिस्तानात जमावाकडून हिंदू मंदिराची तोडफोड, जाळपोळ; जुना ढाचा उद्ध्वस्त

Next

खैबर पख्तुनख्वा: पाकिस्तानात जमावानं एका हिंदू मंदिराची तोडफोड केली आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाटमधील करक जिल्ह्यात बुधवारी ही घटना घडली. मंदिराच्या विस्तार कार्याला विरोध करण्यासाठी आलेल्या जमावानं मंदिराच्या जुन्या ढाच्यासह नवं बांधकामदेखील जमीनदोस्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिकारी इरफान मरवत यांनी दिली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. 

मंदिरावरील हल्ला आणि तोडफोड दुर्दैवी असल्याचं खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी म्हटलं. त्यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला असून दोषींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचं हिंदू समुदायाचे नेते पेशावर हारून सरबयाल यांनी म्हटलं. देशभरातील हिंदू कुटुंबं दर गुरुवारी मंदिराला भेटी द्यायचे. त्या ठिकाणी एका धार्मिक हिंदू नेत्याची समाधी आहे, असंदेखील ते पुढे म्हणाले.

पाकिस्तानच्या लोकसंख्येचा विचार केला गेल्यास हिंदू सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. अधिकृत आकडेवारीनुसार पाकिस्तानातल्या हिंदूंची संख्या ७५ लाख इतकी आहे. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड होत असते. गेल्या महिन्यात सिंध प्रांतात कट्टरवाद्यांनी एका मंदिराचं नुकसान केलं. जुन्या कराचीतल्या शीतलदास कंपाऊंड परिसरात ही घटना घडली. तोडफोड करण्यात आलेल्या प्राचीन मंदिराजवळ जवळपास ३०० हिंदू कुटुंब वास्तव्यास आहेत.
 

Web Title: Angry mob vandalises Hindu temple sets it ablaze in Pakistans Khyber Pakhtunkhwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.