Animal Cruelty: 4 महीन्यांच्या पिलावर हल्ला, शरीराच्या आरपार गेला बाण; लोकांमध्ये संताप...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 10:08 AM2022-05-30T10:08:35+5:302022-05-30T10:08:45+5:30
Animal Cruelty:अमेरिकेतून एका लहानच्या पिलावर क्रूरपणे हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Animal Cruelty: सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांसोबतच्या क्रूरतेचे फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो अमेरिकेतला असून, फोटो पाहून तुमचेही ह्रदय सुन्न होईल. एका लहान 3-4 महिन्यांच्या कुत्र्याच्या पिलावर बाण चालवल्याची घटना घडली आहे. हा बाण त्याच्या शरीराच्या आरपार घुसला.
या फोटोतील निष्पापावर केलेली वागणूक पाहून कोणाचेही हृदय हेलावेल. जनावरांना अशाप्रकारे वागणूक दिल्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही मुक्या जनावरांवर अत्याचार केल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. आता व्हायरल झालेला जखमी पिल्लाचा फोटो अमोरिकेतील आहे. या चार महिन्यांच्या पिल्लाला कोणीतरी क्रूरपणे मारण्याचा प्रयत्न केला, पण सुदैवाने त्याचा जीव वाचला.
This happened today — and our team saved the dog’s life. Thank you so much to @RSO for major assistance! Terrible act! @RivCoNow #Chihuahua#veterinarycare#animalcrueltypic.twitter.com/04R5CLgnkU
— RivCO animalSERVICES (@helpinRIVcoPETS) May 23, 2022
सामाजिक संस्थेला सापडले पिलू
अमेरिकेतील अॅनिमल सर्व्हिसेसला गळ्यात बाण मारलेल्या अवस्थेत चार महिन्यांचे पिल्लू सापडले. बाण जवळजवळ पिल्लाच्या शरीराएवढा लांब होता, जो त्याच्या मानेतून आरपार गेला होता. जखमी पिल्लाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हे चित्र पाहून लोकांमध्येही संताप व्यक्त होत आहे. फोटो पाहून अनेकांना वाटले की कदाचित हे पिल्लू वाचणार नाही, पण आता ते धोक्याच्या बाहेर आहे.