"मी देशद्रोही नाहीये, मी नसरूल्लासोबत भारतात येईन, पण पाकिस्तान..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 12:39 PM2023-08-13T12:39:44+5:302023-08-13T12:40:18+5:30
पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा भारतीयांना संदेश
Anju in Pakistan: भारतातूनपाकिस्तानात गेलेल्या अंजूने तिथून भारताला व भारतीयांना संदेश दिला आहे. समोर आलेल्या अंजूच्या व्हिडिओमध्ये तिने भारतात येण्याबाबत सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये अंजूसोबत नसरुल्लाही (Nasarullah) दिसत आहे. अंजू तिच्या पाकिस्तानी फेसबुक मित्र नसरुल्लाला भेटण्यासाठी जुलैमध्ये खैबर पख्तूनख्वा येथे गेली होती. अंजूचा व्हिसा जो २० ऑगस्टला संपणार होता, तो आता एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. अंजूच्या मते, भारत आणि पाकिस्तान दोन्ही सुंदर देश आहेत. तसेच, ती पाकिस्तानाच गेली असली तरी ती स्वत: देशद्रोही नाही. अंजूचा व्हिडिओ पाहून ती मीडियाशी बोलत असल्याचे दिसते.
भारत पाकिस्तान त्याच भूमीत
नसरुल्लासोबत दिसत असलेली अंजू म्हणाली, 'प्रत्येकाला वाटत आहे की मी पाकिस्तानात आले म्हणून या जागेचे कौतुक करत आहे. पण तसं नाही, इथे जे आहे ते मी सांगत आहे. भारत देखील सुंदर आहे आणि दोन्ही देश म्हणजे एकच भूमी आहे. माणसांनी नंतर त्याची आखली. माझे भारतावर प्रेम नाही असे नाही. मी देशद्रोही नाहीये, पण पाकिस्तान सुंदर देश आहे. असे असले तरी मी भारतात परत जाणार आहे. एकटीही जाणार आहे आणि नसरूल्लाहच्या सोबतही जाणार आहे."
Anju said "I am NOT a '#gaddar'. Media distortions are causing needless chaos.
— Dileep kumar khatri🦚 (@DileepKumarPak) August 13, 2023
I definitely visit India along with Nasrullah after few month.#Gadar2#Anju#Anjunasrullah#Seemasachinpic.twitter.com/AJQInMDn7o
अंजू म्हणते की तिच्याबद्दल मीडियामध्ये खूप अफवा आहेत. नसरूल्लाहसोबतचा फोटो दाखवून तिने आपल्या देशाशी गद्दारी केली, मुलांवर अन्याय केल्याचे बोलले जात आहे. पण तसं अजिबात नाही असं तिचं म्हणणं आहे. 'मीसुद्धा माणूस आहे. माझ्या बाजूनेही थोडा सकारात्मक विचार करा. मी कोणाचीही शत्रू नाही', असे अंजूने म्हटले आहे.
अंजूने अद्याप नसरूल्लाहला पती म्हटलेले नाही...
अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला आणि नसरुल्लाहशी लग्न केल्याचे वृत्त आहे. तिचे इस्लामिक नाव फातिमा असल्याचेही सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे नसरुल्लाह अंजूला त्याची पत्नी म्हणत असताना अंजूने त्याला सार्वजनिकरित्या पती म्हणून संबोधलेले नाही. अलीकडेच नसरुल्लाहने अंजूच्या व्हिसाची मुदत वाढवल्याची माहिती दिली होती. त्याने सांगितले की, गृह मंत्रालयाने तिच्या व्हिसाची मुदत एक वर्षासाठी वाढवली आहे.
नसरुल्लाहचे आवाहन
अंजूच्या मुलांना पाकिस्तानात पाठवण्याची विनंती भारत सरकारला करणार असल्याचं नसरुल्लाह यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. दुसरीकडे अंजूचा भारतीय पती अरविंद याने मुलं भारतातच राहतील असं स्पष्ट केलं आहे. अरविंदने अंजूविरोधात एफआयआरही दाखल केला आहे. या एफआयआरमुळे नसरुल्ला प्रचंड संतापला आहे. भारतीय माध्यमांशी संवाद साधत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. आपण कोणाला घाबरत नसल्याचे त्याने म्हटले आहे. त्याचवेळी सुरक्षा पुरवण्याच्या अटीवर अंजूला भारतात पाठवण्याबाबत त्याने भाष्य केले आहे.