अंजूला पाकिस्तानात VIP ट्रीटमेंट! कोणी पैसे देताहे तर कोणी कपडे; भेटण्यासाठी गर्दी...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 07:32 PM2023-07-27T19:32:47+5:302023-07-27T19:33:31+5:30
मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेली भारतीय महिला अंजू सध्या चर्चेत आली आहे.
प्रियकरासाठी पाकिस्तानातूनभारतात आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण शांत झाले आहे, तर आपल्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी भारतातूनपाकिस्तानात गेलेल्या अंजूचे प्रकरण चर्चेत आले आहे. आता पाकिस्तानात गेलेल्या अंजूला पाकिस्तानात भरुरून प्रेम मिळत आहे. असा दावा अन्य कोणी नाही, तर तिचा प्रियकर नसरुल्ला याने केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नसरुल्लाह म्हणाला की, अनेकजण त्यांना भेटायला येत आहेत. अंजूला भेटवस्तू देत आहेत. कोणी पैसे देत आहेत तर कोणी कपडे भेट देत आहे.
नसरुल्लाह काय म्हणाला?
अंजूचा प्रियकर नसरुल्लाह म्हणाला की, अनेकजण अंजूला भेटायला येत आहेत. अंजू इथे खूप आनंदी आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यही खूप आनंदी आहेत. आम्ही पाहुणचार करणारी माणसं आहोत. आम्ही तिला कोणतीही अडचण येऊ देणार नाही. अंजूलाही इथले लोक, हा देश खूप आवडला आहे. तिला ही तिची जागा असल्याचे वाटते.
अंजू-नसरुल्लाहचा निकाह?
पाकिस्तानी मीडियानुसार अंजूने नसरुल्लासोबत लग्न केले आहे. तिने आपले नावही फातिमा केले असून, इस्लाम धर्म स्वीकारला आहे. 34 वर्षीय अंजूचे भारतात अरविंदसोबत लग्न झाले असून, त्यांना दोन मुलंही आहेत. पण तिच्या म्हणण्यानुसार, तिची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे.