"मी देशासोबत गद्दारी केली नाही, भारताची शत्रू नाही, मलाही जगण्याचा अधिकार पण पाकिस्तान..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 12:58 PM2023-08-17T12:58:54+5:302023-08-17T13:05:16+5:30
भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू आता नसरुल्लाहसोबत पाकिस्तानात फिरत आहे.
भारतातूनपाकिस्तानात गेलेली अंजू आता नसरुल्लाहसोबत पाकिस्तानात फिरत आहे. अंजूने ब्लॉगर ताहिर खानशी संवाद साधला. मी माझ्या देशासोबत कोणतीही गद्दारी केलेली नाही. भारत माझी आई आहे आणि माझा जन्म तिथे झाला. पण पाकिस्तानचे लोकही खूप चांगले आहेत, इथे सकारात्मक वातावरण आहे. नसरुल्लासोबतही भारतात येईन असं अंजूने म्हटलं आहे.
अंजू आणि नसरुल्ला इस्लामाबाद, ब्लॉगरच्या रिसॉर्टमध्ये गेले होते. तेव्हा ब्लॉगर ताहिर खानशी त्यांनी संवाद साधला. ताहिर खान यांच्याशी बोलताना अंजू म्हणाली की मी देशाशी गद्दारी केली नाही, मुलांचाही विश्वासघात केला नाही. पाकिस्तान कसं वाटतं हे विचारलं तेव्हा अंजूने उत्तर दिले की "येथे सर्व काही सकारात्मक आहे. हे एक सुंदर ठिकाण आहे आणि नसरुल्लाह देखील माझ्याबद्दल पूर्णपणे सकारात्मक आहेत."
"भारतातील लोक म्हणतात की, मी येथे य़ेऊन पाकिस्तानची स्तुती करत आहे, परंतु दोन्ही देशातील लोकांमध्ये द्वेष नाही. पूर्वी भारत आणि पाकिस्तान एक होते, एकच जमीन होती. सीमा नंतर केल्या जातात. माझं भारतावर प्रेम आहे आणि मी भारतात जाणार आहे. माझ्यासाठी सकारात्मक विचार करा" असे आवाहनही तिने देशवासीयांना केले आहे. "मी भारताची शत्रू नाही, मी सुद्धा एक माणूस आहे. मलाही जगण्याचा अधिकार आहे."
"इथले लोक भारताला शत्रू मानत नाहीत हे मी इथे पाहिले आहे. माझेही माझ्या भूमीवर प्रेम आहे आणि भारत माझी आई आहे. माझा जन्म भारतात झाला. लोकांनी खूप द्वेष केला आहे. युद्ध लढले आणि आता येथे प्रेम जगले पाहिजे" असं अंजू म्हणते. ब्लॉगर ताहिर खानने अंजूशी बोलताना सांगितले की, त्याला भारतीय क्रिकेटर विराट कोहली आवडतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.