"काय विचार केला अन् काय झालं; मी खूप दुःखी, भारतात जायचंय"; अचानक बदललं अंजूचं वागणं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 02:29 PM2023-08-10T14:29:23+5:302023-08-10T14:31:05+5:30

अंजू तिच्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी खैबर पख्तूनख्वा येथे गेली होती. सुरुवातीला ती सांगत होती की ती पाकिस्तानात फक्त भेटण्यासाठी आली आहे.

anju nasrullah news pakistan anju want to return india says i am very sad | "काय विचार केला अन् काय झालं; मी खूप दुःखी, भारतात जायचंय"; अचानक बदललं अंजूचं वागणं?

"काय विचार केला अन् काय झालं; मी खूप दुःखी, भारतात जायचंय"; अचानक बदललं अंजूचं वागणं?

googlenewsNext

भारतातूनपाकिस्तानात गेलेल्या अंजूला आता पुन्हा एकदा भारतात परतायचं आहे. अंजू तिच्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी खैबर पख्तूनख्वा येथे गेली होती. सुरुवातीला ती सांगत होती की ती पाकिस्तानात फक्त भेटण्यासाठी आली आहे. पण नंतर तिचे असे काही फोटो समोर आले, ज्यावरून तिने नसरुल्लाहसोबत निकाह केल्याचं स्पष्ट झालं. याशिवाय अंजूने तिचा धर्मही बदलला आहे. पण आता अंजूने ती खूप दुःखी असल्याचं म्हटलं आहे.

बीबीसी पाकिस्तानच्या रिपोर्टनुसार, अंजू म्हणाली, "पाकिस्तानात सर्व काही सकारात्मक आहे. काही वेगळेच नियोजन करून मी येथे आले. पण मी जो काही विचार केला त्याऐवजी भलतंच घडलं. माझ्याकडून काहीना काही चूक झाली आहे. इथे जे काही घडले त्यामुळे माझ्या कुटुंबाचा भारतात अपमान झाला आहे. हे सर्व माझ्यामुळे घडलं आहे, त्यामुळे मी खूप दुःखी आहे. दुसरं म्हणजे मुलांच्या मनात माझ्याबद्दल आता नेमकी काय इमेज तयार झाली असेल."

"मला भारतात जायचं आहे"

अंजू पुढे म्हणाली, "मला कोणत्याही मार्गाने भारतात जायचे आहे आणि मी तिथे जाऊ शकते. मला प्रत्येक गोष्टीचा सामना करायचा आहे. मला तिथल्या मीडियालाही उत्तर द्यायचं आहे. त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत. माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही, हे मी त्यांना सांगेन. माझी खूप चांगली काळजी घेतली गेली. हा माझा स्वतःचा निर्णय होता. मीडियाच्या दबावामुळे मी लवकर परत जाऊ शकले नाही. मला एकदा जाऊन मुलांना भेटायचं आहे. कारण मी त्यांना दिवसरात्र मिस करत आहे."

पाकिस्तानने अंजूचा व्हिसा वाढवला असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण अंजूचा पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लाह याने सत्य सांगितलं आहे. वृत्तानुसार, नसरुल्लाहने सांगितलं की, त्यांनी व्हिसाच्या मुदतवाढीसाठी अर्ज केला आहे. मात्र व्हिसाची मुदत वाढलेली नाही. याशिवाय पोलिसांनी असेही म्हटले आहे की त्यांच्याकडे अद्याप असे कोणतेही कागदपत्र नाही, ज्यामुळे अंजूचा व्हिसाची मुदत वाढवण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: anju nasrullah news pakistan anju want to return india says i am very sad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.