जगत्सुंदरीची घोषणा करताना सूत्रसंचालकाकडून नावांची चुकामूक

By admin | Published: December 22, 2015 02:57 AM2015-12-22T02:57:18+5:302015-12-22T02:57:18+5:30

स्थानिक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालकाने घोळ घालून गोंधळ उडवून दिल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. उपस्थित पाहुण्यांचा सन्मान करताना, नावे उच्चारताना गडबड होते.

In the announcement of the Jagatsundari, | जगत्सुंदरीची घोषणा करताना सूत्रसंचालकाकडून नावांची चुकामूक

जगत्सुंदरीची घोषणा करताना सूत्रसंचालकाकडून नावांची चुकामूक

Next

लास वेगास : स्थानिक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालकाने घोळ घालून गोंधळ उडवून दिल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. उपस्थित पाहुण्यांचा सन्मान करताना, नावे उच्चारताना गडबड होते. नियोजनाअभावी अशी चूक घडते; पण अशी चूक जर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित अशा स्पर्धेच्या मंचावर झाली तर..? ‘मिस युनिव्हर्स’ (जगत्सुंदरी) स्पर्धेच्या निकालावेळी अशीच नको ती चूक घडून चक्क उपविजेत्या सुंदरीचे नाव विजेती म्हणून घोषित झाले. एवढेच नाही तर तिच्या डोक्यावर मिस युनिव्हर्सचा मुकुटही ठेवण्यात आला. चूक लक्षात आल्यानंतर उपविजेतीकडून मुकुट परत घेऊन तो विजेत्या सुंदरीला प्रदान करण्यात आला. यामुळे मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या आयोजकांचे प्रचंड हसे झाले.
परीक्षक व लोकांच्या पसंतीआधारे ‘मिस युनिव्हर्स’ म्हणून फिलिपाईन्सची पिया अलोन्झो वर्जकैक हिची निवड झाली होती, तर कोलंबियाची अरियादना ग्वातरेज उपविजेती ठरली होती; मात्र सूत्रसंचालक स्टीव्ह हार्वे यांनी निकाल वाचताना मिस फिलिपाईन्स पिया वर्जकैक हिच्याऐवजी चुकून मिस कोलंबिया ग्वातरेज हिच्या नावाची ‘मिस युनिव्हर्स’ म्हणून घोषणा केली. त्यानंतर परंपरेनुसार २०१४ ची मिस युनिव्हर्स पॉलिना वेगा हिने मिस कोलंबिया ग्वातरेज हिला मिस युनिव्हर्सचा मुकुटही दिला.
ग्वातरेज आनंद व्यक्त करत चाहत्यांचे आभार मानत असताना गडबड झाल्याचे हार्वे यांच्या लक्षात आले. त्यांनी मंच व प्रेक्षागारातील जल्लोष थांबवत निकाल वाचनात घोडचूक झाल्याचे जाहीर केले आणि सभागृहात शुकशुकाट पसरला. चुकीबद्दल क्षमा मागत त्यांनी ग्वातरेज नव्हे, तर मिस फिलिपाईन्स पिया ही मिस युनिव्हर्स ठरली असल्याचे घोषित केले. त्यानंतर ग्वातरेजकडून मुकुट परत घेऊन तो पियाला प्रदान करण्यात आला. या प्रकाराने जगत्सुंदरी स्पर्धेच्या आयोजकांचे हसे झाले.
सोशल मीडियात स्पर्धा आयोजकांवर टीकेचा प्रचंड भडिमार सुरू आहे. दरम्यान, फिलिपाईन्स सुंदरी पिया म्हणाली की, मी ग्वातरेजचे अभिनंदन केले होते. मला माफ करा. मी तिच्याकडील मुकुट काढून घेतलेला नाही.
या स्पर्धेनंतर ती जे काही करू इच्छिते त्याला माझ्या शुभेच्छा असतील. उपविजेती ग्वातरेज म्हणाली की, जे काही घडते त्याला कारण असते. त्यामुळे जे काही मी केले त्याबद्दल मी आनंदी आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणारी ऊर्वशी रौते हिला अंतिम १० मध्ये स्थान मिळवता आले नाही. (वृत्तसंस्था)
टष्ट्वीटरवर अनेकांनी या घटनेबद्दल संताप आणि आयोजकांची कीव करणारे टष्ट्वीट केले. फेसबुकवरही अनेकांनी धक्का बसल्याच्या पोस्ट केल्या आहेत.
८० देशांतील १९ ते २७ वर्षांदरम्यानच्या मुली या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत पहिल्यांदाच प्रेक्षकांनी घरी बसून पसंती दर्शविली. परीक्षकांशिवाय लोकांच्या मतांनाही महत्त्व देण्यात आले.
सूत्रसंचालक हार्वे म्हणाले की, ती माझी चूक होती. मी निकालपत्राचे योग्य वाचन न केल्याची जबाबदारी स्वीकारतो. हार्वे यांनी या चुकीबद्दल टष्ट्वीट करताना पुन्हा चूक केली. त्यांनी जगत्सुंदरी आणि उपविजेतीचे नाव लिहिताना चुकीचे शब्दलेखन केले. नंतर हे टष्ट्वीट काढून टाकण्यात आले.
मी माझ्या घोडचुकीबद्दल मिस फिलिपाईन्स व मिस कोलंबिया यांची मनापासून क्षमा मागतो. मला अत्यंत वाईट वाटत आहे, असे टष्ट्वीट त्यांनी केले. हार्वे यांचा हा संदेश नंतर ७० हजार वेळा रिटष्ट्वीट झाला.

Web Title: In the announcement of the Jagatsundari,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.