इराण प्रश्नावर भारताला अफगाणिस्तानने तारले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 10:25 AM2018-11-07T10:25:19+5:302018-11-07T10:40:43+5:30

एका सामरिक दृष्ट्या महत्वाच्या प्रकल्पावरही बंदी शिथील केली आहे.

Another big relief to India on the Iran issue | इराण प्रश्नावर भारताला अफगाणिस्तानने तारले...

इराण प्रश्नावर भारताला अफगाणिस्तानने तारले...

Next

वॉशिंग्टन : इराणवरील निर्बंधांवरून अमेरिकेने भारतासह आठ देशांना तेल खरेदीसाठी सूट दिलेली असताना आणखी एका सामरिक दृष्ट्या महत्वाच्या प्रकल्पावरही बंदी शिथील केली आहे.


चीन आणि पाकिस्तानला शह देण्यासाठी भारतइराणचेचाबहार बंदर विकसित करत आहे. हे बंदर पाकिस्तानच्या सीमेला लागून असल्याने सामरिक आणि व्यवसायासाठी भारताला अत्यंत फायद्याचे ठरणार आहे. या बंदराद्वारे भारताला इराण आणि अफगाणिस्तानमधील बाजारपेठ खुली होणार आहे. या बंदराच्या निर्माणामध्ये अमेरिकेने इराणवर लादलेल निर्बंध आड येत होते.


अमेरिकेने भारताला या बंदराच्या विकासासाठी मुभा दिल्याने आता इराण- अफगाणिस्तानच्या रेल्वे मार्गाचाही प्रश्न सुटला आहे. अमेरिकेने शांतीसेनेच्या मदतीने अफगाणिस्तानातील दहशतवाद मोडीत काढला होता. मात्र, या देशाचे पुनर्वसन करणे त्यापेक्षाही कठीण काम आहे. यामुळे चाबहार बंदर अफगाणिस्तानच्या विकासासाठी खूप महत्वाचे आहे. यामुळे चाबहार बंदराचा विकास करण्याची भारताची भुमिका अमेरिकेने मान्य केली असून हे देखील एक कारण यामागे असल्याचे बोलले जात आहे. 


अमेरिकेने इराणवर आजपर्यंतचे सर्वात कठोर निर्बंध लागू केले आहेत. इराणकडून तेल खरेदीसाठी भारतासह चीन, ग्रीस, जपान, द. कोरिया. तैवान आणि तुर्कस्तानला तात्पुरती सूट देण्यात आली आहे. 
 

Web Title: Another big relief to India on the Iran issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.