डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 05:13 PM2024-11-06T17:13:58+5:302024-11-06T17:15:16+5:30
Donald Trump Daughter News: ट्रम्प यांची व्याभिचारी वर्तणूक पाहता अनेकांना यावर विश्वासही बसत आहे. परंतू, ही अचानक ट्रम्प माझे पिता असे सांगणारी तरुणी कोण याकडेही सर्वांचे कुतुहल वाढू लागले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे कारकीर्द जेवढी यशस्वी राहिली आहे, त्याच्या दुप्पट त्यांची कारकीर्द वादग्रस्तही राहिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक महिलांशी संबंध राहिलेले आहेत. एका पॉर्न स्टारशी संबंधांच्या प्रकरणात त्यांच्यावर खटलाही सुरु आहे. अशातच ट्रम्प यांना चार वर्षांनी अमेरिकेचे पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पद मिळाले आहे. त्यांचा विजय निश्चित होताच ट्रम्प यांची मीच खरी औलाद असल्याचा दावा करत पाकिस्तानी तरुणी समोर आली आहे.
ट्रम्प यांची व्याभिचारी वर्तणूक पाहता अनेकांना यावर विश्वासही बसत आहे. परंतू, ही अचानक ट्रम्प माझे पिता असे सांगणारी तरुणी कोण याकडेही सर्वांचे कुतुहल वाढू लागले आहे. या पाकिस्तानी तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
मी ट्रम्प यांची सख्खी मुलगी आहे, ट्रम्प माझे वडील आहेत. यावर कोणाला संशय असता नये. मी मुस्लिम आहे. इंग्रजी लोक जेव्हा इकडे येतात व मला पाहतात तेव्हा ते म्हणतात की ही इकडे काय करतेय? ट्रम्प माझ्या आईला नेहमी म्हणायचे की तू खूप बेजबाबदार आहेस, माझ्या मुलीची काळजी घेऊ शकत नाहीस, असे ही तरुणी या व्हिडीओत सांगत आहे.
Does @realDonaldTrump know he has children in Pakistan who speak Urdu & English in Punjabi? pic.twitter.com/anhRKbiLGo
— Pakistan Untold (@pakistan_untold) November 6, 2024
टम्प यांनी १३२ वर्षांपूर्वीचा इतिहास मोडून दाखविला आहे. सलग दोन निवडणुका न जिंकता एखादी व्यक्ती दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनली आहे. २०२० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्यो बायडन यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र पराभवाचा धक्का बसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. तसेच त्यांनी आक्रमक प्रचार करत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीही मिळवली होती. त्यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस यांनी आव्हान उभं केलं होतं. मात्र अटीतटीची मानली जाणारी ही अध्यक्षीय निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली. आता अमेरिकेचे ४७ वे राष्ट्रपती म्हणून ते जानेवारी महिन्यात शपथ घेतील.