कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 09:33 AM2024-05-10T09:33:55+5:302024-05-10T09:38:04+5:30
इराणने इस्रायलच्या पोर्तुगीज मालवाहू जहाजावरील ५ भारतीयांची सुटका केली आहे.
कतारमधूनभारतीय नौदलाचे आठ माजी सैनिक सुरक्षित परतल्यानंतर भारताला आणखी एक मोठे राजनैतिक यश मिळाले आहे. इराणने इस्रायलच्या पोर्तुगीज मालवाहू जहाजावरील ५ भारतीयांची सुटका केली आहे. भारतीयांच्या सुटकेसाठी नवी दिल्लीतून सातत्याने राजनैतिक प्रयत्न सुरू होते. आता तेहरानने ५ भारतीयांची सुटका केली आहे. याबाबत इराणमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
इराणने पोर्तुगीज ध्वजवाहू MSC Aries च्या ७ क्रू सदस्यांना सोडले आहे. हे मालवाहू जहाज १३ एप्रिल रोजी ताब्यात घेण्यात आले होते. 'सुटका करण्यात आलेल्या लोकांमध्ये ५ भारतीय, एक फिलिपिनो नागरिक आणि एक एस्टोनियन नागरिकांचा समावेश आहे. हे कंटेनर जहाज इराणने इस्रायलशी संबंधीत असल्यामुळे जप्त केले होते,अशी माहिती पोर्तुगालच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
पोर्तुगालने राहिलेल्या १७ क्रू सदस्यांना त्वरित बाहेर काढण्याची मागणी केली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने १३ एप्रिल रोजी रोझी होर्मुझ समुद्राजवळ कंटेनर जहाज MSC Aries ताब्यात घेतले. यात १७ भारतीय नागरिक होते. १२ एप्रिल रोजी दुबईच्या किनाऱ्यापासून होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जाताना रोझी हे शेवटचे जहाज होते. इस्रायल आणि इराण यांच्यातील तीव्र संघर्षाच्या काळात ही जहाजे जप्त केली असती.
जहाज ताब्यात घेतल्यानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'या जहाजाचा ज्यू राजवटीशी संबंध असल्याचे निश्चित आहे.' भारताने जहाजावरील भारतीय क्रू सदस्यांच्या सुटकेची मागणी केली होती. १४ एप्रिल रोजी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारतीय क्रू मेंबरच्या सुटकेबाबत त्यांचे इराणचे समकक्ष होसेन अमीर-अब्दुल्लाहियान यांच्याशी चर्चा केली होती. चालक दलाच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत डॉ. जयशंकर यांनी इराणकडे मदत मागितली होती.