जमातच्या आणखी एका नेत्याला मृत्युदंडाची शिक्षा
By admin | Published: November 3, 2014 02:49 AM2014-11-03T02:49:33+5:302014-11-03T02:49:33+5:30
बांगलादेशातील जमात ए इस्लामी या दहशतवादी संघटनेचा आणखी एक नेता, तसेच माध्यम सम्राट मीर कासीम अली याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
ढाका : बांगलादेशातील जमात ए इस्लामी या दहशतवादी संघटनेचा आणखी एक नेता, तसेच माध्यम सम्राट मीर कासीम अली याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. बांगलादेशातील युद्ध गुन्हे हाताळणाऱ्या विशेष लवादाने काही दिवसांपूर्वी संघटनेच्या प्रमुखाला फाशीची शिक्षा सुनावली असून, त्याच प्रकारच्या गुन्ह्यासाठी मीर कासीम अली यालाही शिक्षा सुनावण्यात आली.
तीन सदस्यीय युद्ध लवादाच्या प्रमुखांनी ही शिक्षा सुनावली असून, मीर कासीम अली याला मरेपर्यंत फाशी द्यावी, असे म्हटले आहे. शिक्षा सुनावली जात असताना ६२ वर्षे वयाचा मीर अली गोंधळलेल्या नजरेने पाहत होता.
फाशीबरोबरच मीर अली याला इतर गुन्ह्यांसाठी ७२ वर्षे कारावासाचीही शिक्षा सुनावण्यात आली आहे. अल बद्र दहशतवादी संघटनेचा अली हा तिसऱ्या क्रमांकाचा नेता होता, तसेच जमातचा तो आर्थिक मदतगार होता. (वृत्तसंस्था)