आठवडाभरात ब्रिटनमध्ये कोरोनाचा आणखी एक नवा विषाणू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 02:14 AM2020-12-25T02:14:07+5:302020-12-25T06:57:53+5:30

Another new corona virus in Britain : द. आफ्रिकेहून ब्रिटनमध्ये गेल्या दोन आठवड्यांत आलेल्या प्रवाशांपैकी दोन जणांमध्ये हा नवा विषाणू आढळून आला. या दोघांची विलगीकरणात रवानगी करण्यात आली आहे.

Another new corona virus in Britain in a week | आठवडाभरात ब्रिटनमध्ये कोरोनाचा आणखी एक नवा विषाणू

आठवडाभरात ब्रिटनमध्ये कोरोनाचा आणखी एक नवा विषाणू

Next

लंडन : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडून अद्याप आठवडाही पूर्ण झालेला नाही, तोच कोरोनाचा अधिक  मोठी संसर्गशक्ती असलेला आणखी एक नवा विषाणू त्याच देशामध्ये आढळला आहे. 
द. आफ्रिकेहून ब्रिटनमध्ये गेल्या दोन आठवड्यांत आलेल्या प्रवाशांपैकी दोन जणांमध्ये हा नवा विषाणू आढळून आला. या दोघांची विलगीकरणात रवानगी करण्यात आली आहे. ही घोषणा ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी एका पत्रकार परिषदेत केली. या अगदी नव्या विषाणूची संसर्गक्षमताही मोठी असून, त्यामुळे ब्रिटनचे सरकार अधिक दक्ष झाले आहे.कोरोना साथीचा वाढता प्रसार लक्षात घेता ब्रिटनमधील पूर्व व दक्षिण भागात लॉकडाऊनचे अधिक कडक नियम लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पहिल्या विषाणूपेक्षा त्यानंतर आढळून आलेल्या नव्या विषाणूची संसर्गक्षमता ७० टक्के अधिक होती. आता त्यानंतर पुन्हा सापडलेला नवा कोरोना विषाणू आणखी संसर्गशक्तीचा आहे. त्याच्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 
देशात बरे झालेल्यांची संख्या ९७ लाखांच्या घरात

देशात कोरोनातून बरे 
झालेल्यांची संख्या ९७लाखांच्या घरात 
पोहोचली असून त्यांचे प्रमाण आहे
९५.७५%

देशात गुरुवारी सापडलेले रुग्ण
२४,७१२
बरे होणाऱ्यांची संख्या 
२९,७९१
कोरोना रुग्णांची एकूण संख्या 
१,०१,२३,७७८
बरे होणाऱ्यांचा आकडा 
९६,९३,१७३

Web Title: Another new corona virus in Britain in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.