ड्रॅगनच्या अर्थव्यवस्थेला आणखी एक हादरा! ...म्हणून चीन मधून बिऱ्हाड गुंडाळतायत परदेशी कंपन्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 11:11 PM2023-09-16T23:11:07+5:302023-09-16T23:14:42+5:30

आर्थिक आघाडीवर अडचणींचा सामना करत असलेल्या चीनला, या संकटातून पुन्हा एकदा पटरीवर आणण्यात राष्ट्रपती शी जिनपिंग अपयशी ठरताना दिसत आहे.

Another shock to the dragon's economy Foreign companies are closing their business from China | ड्रॅगनच्या अर्थव्यवस्थेला आणखी एक हादरा! ...म्हणून चीन मधून बिऱ्हाड गुंडाळतायत परदेशी कंपन्या

ड्रॅगनच्या अर्थव्यवस्थेला आणखी एक हादरा! ...म्हणून चीन मधून बिऱ्हाड गुंडाळतायत परदेशी कंपन्या

googlenewsNext

कोरोनापूर्वी जगाची फॅक्ट्री म्हणून ओळखला जाणारा चीन आज आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी धडपडताना दिसत आहे. चीनचीअर्थव्यवस्था पार डबघाईला आली आहे. आर्थिक आघाडीवर अडचणींचा सामना करत असलेल्या चीनला, या संकटातून पुन्हा एकदा पटरीवर आणण्यात राष्ट्रपती शी जिनपिंग अपयशी ठरताना दिसत आहे. चीनला त्याची मुजोरी आता महाग पडत आहे. अमेरिकेची चीनबद्दलची कटुता कुणापासूनही लपून राहिलेली नाही. आता जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एका गुंतवणूकदाराने चीनला हादरा दिला आहे.

महत्वाचे म्हणजे, परकीय गुंतवणूकदारांनी आपली चीनमधील गुंतवणूक काढून घेण्यास सुरूवात केली आहे. एवढेच नाही, तर जगातील अनेक देशांनी चीनला चीनला बॉयकॉट करायला सुरुवात केली आहे. 

चीनमधून आपला कारभार गुंडाळतेय कंपनी -
जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक, सॉवरेन वेल्थ फंड ऑपरेट करणाऱ्या नॉर्गेस बँक इन्व्हेस्टमेन्ट मॅनेजमेन्टने (NBIM) चीनमधील आपला कारभार गुंडाळण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर एमबीआयएमने या वर्षाच्या अखेरपर्यंत चीनमधील आपले कार्यालय बंद करन्याचीही घोषणा केली आहे. चीनमधील जवळपास 805 कंपन्यांमध्ये हिची तब्बल 42 अब्ज डॉलरची हिस्सेदारी आहे, यावरूनच हा चीनला केवढा मोठा धक्का आहे, याचा अंदाज येऊ शकतो. महत्वाचे म्हणजे, ही फर्म नॉर्वे सरकारचा 1.4 ट्रिलियन डॉलरचा पेंशन फंड देखील मॅनेज करते. जो स्टॉक मार्केटमध्ये जगातील सर्वात मोठा सिंगल गुंतवणूकदार आहे.

कंपन्या सोडतायत चीनची साथ -
चीन सरकारची वर्तणूक आणि व्यवसायातील ढवळाढवळ, यामुळे कंपन्या आधीच चीनवर नाराज आहेत. तसेच चिनी अर्थव्यवस्थेत आलेल्या स्लोडाउनने कंपन्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नॉर्गेस बँक इन्व्हेस्टमेन्ट मॅनेजमेन्टनेट नव्हे, तर जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी चीनमधील आपला कारभार गुंडाळायला सुरुवात केली आहे.

Web Title: Another shock to the dragon's economy Foreign companies are closing their business from China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.