लंडनमध्ये भारतविरोधी मिलियन मार्चचा फज्जा

By admin | Published: October 28, 2014 02:18 AM2014-10-28T02:18:49+5:302014-10-28T10:13:44+5:30

बिलावल भुत्ताे याच्या काश्मीरबाबतच्या बेताल वक्तव्याला लंडनमध्ये काढण्यात आलेल्या काश्मीरवरील मिलियन मार्चमध्ये चांगलाच जबाब मिळाला.

Anti-India Million March Freedom in London | लंडनमध्ये भारतविरोधी मिलियन मार्चचा फज्जा

लंडनमध्ये भारतविरोधी मिलियन मार्चचा फज्जा

Next
लंडन : पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चा अध्यक्ष व पाकच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्ताे यांचा मुलगा बिलावल भुत्ताे याच्या काश्मीरबाबतच्या बेताल वक्तव्याला लंडनमध्ये काढण्यात आलेल्या काश्मीरवरील मिलियन मार्चमध्ये चांगलाच जबाब मिळाला. रविवारी काढलेल्या या मोर्चात बिलावलने जेव्हा बोलण्याचा प्रय} केला, तेव्हा त्याला धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे बिलावल महाशयांना आपले भाषण गुंडाळावे लागले.
काश्मीर प्रश्नाला जागतिक स्वरूप देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाचे नाव मिलियन मार्च असले तरीही मोर्चात सहभागी लोकांची संख्या शंभरापेक्षा जास्त नव्हती. 
ट्रॅफल्गार चौक ते डाऊनिंग स्ट्रीट या मार्गावर चाललेल्या या मोर्चाचे विसजर्न डाऊनिंग स्ट्रीट येथे झाले व तिथे उभारलेल्या तात्पुरत्या स्टेजवर बोलण्यासाठी बिलावल उभा राहिला. त्याबरोबर समोर असलेल्या प्रेक्षकांनीही त्याच्या विरोधात घोषणा दिल्या, त्याच्यावर रिकाम्या बाटल्या फेकल्या, तसेच बिलावलच्या अंगावर अंडी व टोमॅटो फेकण्यात आली.
हा मारा असा झाला की, बिलावलला बोलणो अशक्य झाले. काश्मीर व काश्मिरी जनतेचे कल्याण यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. याच्याशी बिलावलचा काय संबंध, असा प्रश्न संतप्त निदर्शक विचारत होते. (वृत्तसंस्था)
 
 
 
हा मोर्चा बॅरिस्टर सुलतान मेहमूद चौधरी यांनी काढला होता. ते पाकव्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान आहेत, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.  
 
4लंडनमध्ये भारतविरोधी गटाने काढलेल्या मोर्चाला विरोध म्हणून प्रतिरोधी गटाकडून एक मोर्चा काढण्यात आला. भारतविरोधी मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचा दावा संयोजक सुलतान मेहमूद चौधरी यांनी केला.
 
4मोर्चात विविध जाती-धर्माचे लोक सहभागी झाले असे त्यांचे म्हणणो होते. पण प्रतिस्पर्धी गटाने हा मोर्चा जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या राष्ट्रीय हिताविरोधात असल्याचे म्हटले आहे. 
 
4या गटाने दोन्ही देशांना निवेदने दिली असून, त्यात जम्मू व काश्मीरच्या सर्व जनतेच्या मानवी हक्कांचे संरक्षण करावे, असे आवाहन केले आहे. 

 

Web Title: Anti-India Million March Freedom in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.