थायलंडमध्ये बंडविरोधकांचा मोर्चा

By admin | Published: May 25, 2014 11:41 PM2014-05-25T23:41:45+5:302014-05-25T23:41:45+5:30

बंडानंतर सत्तेवर आलेल्या लष्कराने जमावबंदी घातलेली असतानाही बंडाला विरोध करणार्‍या १ हजार आंदोलकांनी रविवारी बँकॉक शहरात मोर्चा काढला

Anti-rebel Front in Thailand | थायलंडमध्ये बंडविरोधकांचा मोर्चा

थायलंडमध्ये बंडविरोधकांचा मोर्चा

Next

बँकॉक : बंडानंतर सत्तेवर आलेल्या लष्कराने जमावबंदी घातलेली असतानाही बंडाला विरोध करणार्‍या १ हजार आंदोलकांनी रविवारी बँकॉक शहरात मोर्चा काढला. गेट आऊट अशा घोषणा देत हे आंदोलक शहराच्या मुख्य भागात आले. बँकॉक शहरात मोठ्या प्रमाणावर सैनिक तैनात आहेत; पण समर्थ लष्कराला निषेधाची जाणीव करून देणारा हा मोर्चा होता. देशात मार्शल लॉ लागू असल्याने मोर्चे काढण्यास बंदी आहे; पण हा मोर्चा रोखण्यास पोलीस पुढे आले नाहीत. लष्कराने माजी पंतप्रधान यिंगलुक शिनवात्रा यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांना अटक केली असून, या कारवाईवर आंतरराष्टÑीय पातळीवर टीका होत आहे. अमेरिकेने लष्करी सराव थांबवला वॉशिंग्टन - थायलंडमध्ये लोकशाही सरकार बडतर्फ करून लष्कराने बंडाद्वारे सत्ता हाती घेतल्याचा अमेरिकेने निषेध केला असून,थायलंडसोबत सुरूअसणारा लष्करी सराव रद्द केला आहे, तसेच अनेक द्विपक्षीय करारही रद्द केले आहेत. थायलंडच्या लष्कराने गुरुवारी बंड करून देशाची सत्ता हाती घेतली. त्यानंतर माजी पंतप्रधानांसह अनेक वरिष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली असून, सिनेट भंग करण्यात आली आहे. पेटॅगॉनचे प्रसिद्धी सचिव रिअर अ‍ॅडमिरल जॉन किर्बी यासंदर्भात बोलताना म्हणाले की, थायलंडशी आमचे दीर्घकाळ लष्करी संबंध आहेत; पण अमेरिकेच्या कायद्यानुसार तेथे लष्करी बंड झाल्यानंतर मदतीबाबत पुन्हा एकदा विचार करावा लागेल. पेटॅगॉनने २०१४ चा लष्करी सराव रद्द केला आहे. या सरावात ७०० अमेरिकन सैनिक, नौदलाचे सैनिक, खलाशी जहाजे व विमाने सहभाग घेतात. (वृत्तसंस्था)

Web Title: Anti-rebel Front in Thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.