संपूर्ण युरोपात दहशतवादविरोधी शोध मोहिम

By admin | Published: January 17, 2015 02:18 AM2015-01-17T02:18:47+5:302015-01-17T07:08:29+5:30

बॉम्ब असल्याच्या अफवेने पॅरिसमधील गारे डी १ हे रेल्वेस्थानक बंद करून रिकामे करण्यात आले असून, या भागात दहशतवादविरोधी कारवाईत १० संशयितांना अटक

Anti-terrorism search campaign throughout Europe | संपूर्ण युरोपात दहशतवादविरोधी शोध मोहिम

संपूर्ण युरोपात दहशतवादविरोधी शोध मोहिम

Next

पॅरिस : बॉम्ब असल्याच्या अफवेने पॅरिसमधील गारे डी १ हे रेल्वेस्थानक बंद करून रिकामे करण्यात आले असून, या भागात दहशतवादविरोधी कारवाईत १० संशयितांना अटक करण्यात आली आहे. पूर्वकाळजी म्हणून हे रेल्वेस्थानक बंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गारे डी हे पॅरिसमधील एक गर्दीचे रेल्वेस्थानक असून, पूर्वेकडील शहरांना ते जोडलेले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी हे पॅरिसमधील हल्यानंतर पॅरिस भेटीवर आले असून त्यांच्या दौऱ्यादरम्यान या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, जर्मनीत बर्लिन शहरात आज दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून, ते इस्लामिक स्टेटसाठी जिहादींची भरती करीत असल्याचा आरोप आहे.
दोन दहशतवादी ठार
दरम्यान, बेल्जियममधील पोलिसांनी दहशतवादी चकमकीत गोळीबार केला यात दोन संशयित दहशतवादी ठार झाले आहेत. ब्रुसेल्सपासून ७५ मैलावर असणाऱ्या वर्वियर्स येथे ही चकमक झाली. येथील रेल्वेस्थानकात पोलीस दहशतवाद्यांच्या जवळ गेले असता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. काही मिनिटांत दोन दहशतवादी ठार झाले व तिसरा जखमी झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या चकमकीनंतर देशातील अलर्टची पातळी वाढविण्यात आली आहे. युरोपवर सावट
पॅरिस येथील चार्ली हेब्डो साप्ताहिकावर झालेल्या हल्ल्यात १२ जणांचा बळी गेल्यानंतर दहशतवादी घटनांची मालिका सुरू झाली असून संपूर्ण युरोपभर त्याचे सावट पसरलेले आहे. युरोपमधील सर्वच देशातील युवक इस्लामिक स्टेटच्या लढाईत सहभागी होण्यासाठी गेले असून, त्यांच्यापैकी काहीजण परतत आहेत. त्यांचीही धरपकड करण्यात येत असल्याने वातावरण स्फोटक बनले आहे. (वृत्तसंस्था)

> या चकमकीची चित्रफीत वेबसाईटवर टाकण्यात आली असून त्यात अंधाऱ्या इमारतीत चाललेले स्फोट दिसत आहेत.
> बेल्जियमच्या हल्लेखोराचा दावा
> वर्वियर्स येथील चकमकीत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची चौकशी सुरू असून, त्याने पॅरिसमधील हल्लेखोर कौलीबली याच्या पत्नीकडून आपण कार खरेदी करणार होतो असे सांगितले आहे. सध्यातरी पॅरिसमधील दहशतवादाशी बेल्जियमच्या आरोपींचा हाच संबंध आहे.

Web Title: Anti-terrorism search campaign throughout Europe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.