चीनला अमेरिकेची Apple देणार टक्कर; स्वस्त iPhone चे चालविणार 'चक्कर'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 06:10 PM2020-06-26T18:10:38+5:302020-06-26T18:12:38+5:30

कॅलिफोर्नियाची कंपनी असलेली अॅपल लवकरच iPhone 12 चे काही मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. यामध्ये आयफोन 12 चे दोन फोर जी मॉडेल असतील.

Apple will launch cheap iPhone 12 4G smartphones to capture India like markets | चीनला अमेरिकेची Apple देणार टक्कर; स्वस्त iPhone चे चालविणार 'चक्कर'

चीनला अमेरिकेची Apple देणार टक्कर; स्वस्त iPhone चे चालविणार 'चक्कर'

Next

नवी दिल्ली : चीनच्या कंपन्यांनी स्वस्तात मस्त स्मार्टफोन बाजारात आणून मोठमोठ्या कंपन्यांचे बँड वाजवले आहेत. त्यात अॅपल आणि सॅमसंग या कंपन्या टिकून आहेत. चीनची स्मार्टफोन कंपनी वनप्लसने 25 हजारांपेक्षाही कमी किंमतीत स्मार्टफोन आणण्याचे जाहीर केल्याने आता या किंमत युद्धात अमेरिकेची अॅपलही उतरली आहे. 


कॅलिफोर्नियाची कंपनी असलेली अॅपल लवकरच iPhone 12 चे काही मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. यामध्ये आयफोन 12 चे दोन फोर जी मॉडेल असतील. या सोबतच कंपनी ५जी असलेले फोन लाँच करणार आहे. मात्र, ४जीचे फोन भारतासारख्या ४जी सेवा असलेल्या देशांमध्ये लाँच केले जाणार आहेत. या बाजारांमध्ये आयफोनच्या किंमतीही कमी केल्या जाणार आहेत. यामुळे महागडे आयफोन घेऊ न शकणारे लोकही याकडे वळतील अशी अपेक्षा कंपनीला आहे. 


अॅनालिस्ट डॅनिअल इव्स यांच्यानुसार LTE इनेबल्ड iPhone 12 ची किंमत 549 यूएस डॉलर (41,500 रुपये)पासून असणार आहे. याशिवाय दुसऱ्या आयफोनचे 4G मॉडेल iPhone 12 Max असू शकते. याची किंमत 649 यूएस डॉलर (49,000 रुपये) असू शकणार आहे. अॅपल आता आयफोनची ५जी मॉडेल आणणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता स्वस्त ४जी मॉडेलकडे लक्ष दिले जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 
दरम्यान, नवीन ४जी आयफोन 12 च्या मॉडेलची नावे ठरविण्यात आलेली नाहीत. कदाचित आयफोन 12 हे नाव नसणार आहे. कारण त्याचा ५जीच्या मॉडेलवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या ४ जी मॉडेलमध्ये एलसीडी डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. दुसरे अॅनलिस्ट जुन झांग यांनी आणखी काही माहिती शेअर केली आहे. त्यांनी 2019 मध्येच सांगितले होते, की आयफोनचे 6 फोन लाँच केले जाऊ शकतात. यामध्ये 4जी वाले फोनही असतील. तसेच एलसीडी डिस्प्ले असेल. 


वनप्लसही आणणार स्वस्त फोन
वनप्लस या चीनच्या प्रिमिअम स्मार्टफोन कंपनीने यंदाचे फ्लॅगशिप हँडसेट OnePlus 8  आणि OnePlus 8 Pro लाँच केले आहेत. काही दिवसांपूर्वीच 25000 च्या आतील फोन बाजारात येणार असल्याचे संकेत दिलेले असताना पुन्हा काहीतरी नवीन येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने वनप्लस Z/OnePlus Nord ची घोषणा केली आहे. या फोनचे लाँचिंगही लवकरच करण्यात येणार आहे. 


वनप्लस झेडमध्ये काय काय? 
वनप्लस झेडबाबत गेल्या काही काळापासून वातावरण तापलेले आहे. अनेक जण अनेक प्रकारच्या शक्यता व्यक्त करत आहेत. हा हँडसेट जुलैमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये 90 HZ ची ओएलईडी स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 765 चिपसेट, 30 वॉट चार्जिंग आणि क्वाड कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. या वनप्लस झेडची किंमत 24000 पेक्षा कमी असण्याची शक्यता असून 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. तसेच या फोनमध्ये 4300एमएएचची बॅटरी असणार आहे. 
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Unlock 2 ची तयारी सुरु; शाळा, कॉलेज सुरु होणार? मोदी लवकरच निर्णय घेणार

पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित

CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी

OMG पोकेमॉन 'खुळे'! आजोबा सायकलवर तब्बल 64 फोन लावून खेळत हिंडतात

मोदी सरकार मोठा निर्णय घेणार; नोकरदारांना ग्रॅच्युईटीमध्ये दिलासा देणार

चीनच नाही, अमेरिकाही विश्वासघातकी! एकेकाळी भारतावरच हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते

सोन्याला 'ऐतिहासिक' झळाळी, तोळ्याचा दर 50 हजार पार; दोन वर्षांत होईल 'चमत्कार'

Web Title: Apple will launch cheap iPhone 12 4G smartphones to capture India like markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.