इराणच्या संसदेची अणुकराराला मान्यता

By admin | Published: October 14, 2015 01:06 AM2015-10-14T01:06:30+5:302015-10-14T01:06:30+5:30

इराणने अमेरिकेसह जगातील सहा बड्या देशांशी केलेल्या ऐतिहासिक अशा अणुकराराला इराणच्या संसदेने मंगळवारी मान्यता दिली

The approval of Iran's nuclear program | इराणच्या संसदेची अणुकराराला मान्यता

इराणच्या संसदेची अणुकराराला मान्यता

Next

तेहरान : इराणने अमेरिकेसह जगातील सहा बड्या देशांशी केलेल्या ऐतिहासिक अशा अणुकराराला इराणच्या संसदेने मंगळवारी मान्यता दिली. मान्यता मिळाल्यामुळे कराराच्या औपचारिक अंमलबजावणीला सुरुवात होईल.
मान्यतेचा ठराव १६१ विरुद्ध ५९ मतांनी संमत झाला. १३ जणांनी मतदानात भाग घेतला नाही, असे इराणची अधिकृत वृत्तसंस्था ‘इरना’ने वृत्त दिले. दोन वर्षे चर्चा व वादावादीनंतर गेल्या १४ जुलै रोजी हा महत्त्वाचा करार झाला. या करारामुळे इराणवरील आर्थिक व अन्य निर्बंध मागे घेण्यात आले.
आता इराणला अणुबॉम्ब तयार करता येणार नाही. आपला अणुकार्यक्रम हा शांततेसाठीच असल्याचे त्याला आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा विभागाला समाधानकारकरीत्या पटवून द्यावे लागेल. (वृत्तसंस्था)

Web Title: The approval of Iran's nuclear program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.