बाबो! शेतकऱ्याच्या शेतात २ हजार वर्षांपासून दबला होता किंमती खजिना, जमीन खोदताच चमकलं नशीब!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:53 PM2022-01-21T18:53:56+5:302022-01-21T19:06:26+5:30

German archaeologist discover 41 celtic gold coins : हा खजिना दोन हजार वर्षापर्यंत त्याच्या शेतात दडून होता. एका व्यक्तीला आकाशातून पडलेली सोन्याची नाही सापडली आहेत तेही ४१ नाणी.

Archaeology breakthrough as 'once in a lifetime' hoard of 2,000-year-old gold coins found | बाबो! शेतकऱ्याच्या शेतात २ हजार वर्षांपासून दबला होता किंमती खजिना, जमीन खोदताच चमकलं नशीब!

बाबो! शेतकऱ्याच्या शेतात २ हजार वर्षांपासून दबला होता किंमती खजिना, जमीन खोदताच चमकलं नशीब!

googlenewsNext

जगभरात अनेकदा खजिना सापडल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. ज्यात अचानक एखाद्या घटनेनंतर हरवलेला खजिना सापडतो. तर कुणी खजिना लपवून विसरून जातात. असा सापडलेला खजिना लोकांना आनंद देतो. असाच एका खजिना एका शेतकऱ्याला  सापडला. हा खजिना दोन हजार वर्षापर्यंत त्याच्या शेतात (German archaeologist discover 41 celtic gold coins) दडून होता. एका व्यक्तीला आकाशातून पडलेली सोन्याची नाही सापडली आहेत तेही ४१ नाणी.

हा खजिना उत्तरपूर्व जर्मनीच्या (Germany) ब्रांडेनबर्गमध्ये सापडला. वैज्ञानिकांनी एका शेतकऱ्याच्या शेतातून ही नाणी शोधून काढली आहेत. हा शोध फारच मोठा मानला जात आहे. जर्मनीमध्ये फ्रीलान्सर म्हणून काम करणाऱ्या या पुरातत्ववाद्यांनी शेतातून सेल्टिक नाणी (Celtic Coins) शोधून काढली आहेत. रिपोर्टनुसार ही नाणी फार किंमती असतात. असं म्हटलं जातं की, हे एखाद्या खाणीत नाही तर इंद्रधनुष्यापासून शेवटच्या टोकापासून तयार होता. त्यामुळेच त्यांना रेनबो कपही म्हटलं जातं.

शेतातून ४१ सोन्याची नाणी सापडल्याची बातमी ब्रांडेनबर्गचे सांस्कृतिक मंत्री मांदा शूले यांनी कन्फर्म केली आहे. ते म्हणाले की, ही नाणी साधारण २ हजार वर्ष जुनी आहेत. ही नाणी फारच वेगळी आहेत. वैज्ञानिक सांगतात की, या नाण्यांबाबतची एका कथा यांना फारच दुर्मीळ बनवते.

असं म्हटलं जातं की, ही नाणी इंद्रधनुष्याच्या शेवटच्या टोकापासून तयार होतात. पृथ्वीवर ज्या ठिकाणी इंद्रधनुष्याचं शेवटचं टोक पृथ्वीला टच करतं, तिथे ही नाणी पडतात. ही नाणी शोधणारे वोल्फगॅंग हर्कट जे ब्रेंडेनबर्ग स्टेट हेरिटेज मॅनेजमेंट अॅन्ड आर्किओसॉजिकल स्टेट म्युझियमचे एक स्वयंसेवक पुरातत्ववादी आहेत. त्यांना शंका होती की, शेतकऱ्याच्या शेतात ही नाणी आहेत. मालकाची  परवानगी घेऊन खोदकाम करण्यात आलं तेव्हा पहिल्यांदा १० नाणी सापडली. नंतर एकूण ४१ नाणी सापडलीत.
 

Web Title: Archaeology breakthrough as 'once in a lifetime' hoard of 2,000-year-old gold coins found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.