America Arctic Blast: अमेरिकेत आर्क्टिक ब्लास्ट; बर्फापेक्षाही गारठली, -79 डिग्रीवर पोहोचले तापमान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 11:55 PM2023-02-04T23:55:19+5:302023-02-04T23:55:35+5:30
उत्तर ध्रुवाभोवतीचा भाग आर्क्टिक म्हणून ओळखला जातो. आर्क्टिक स्फोटात या भागातून थंड हवेचा मोठा गोळा कॅनडामार्गे अमेरिकेत पोहोचतो आणि अमेरिकेच्या बहुतांश भागात तापमानात अचानक घट नोंदवली जाते.
अमेरिकेमध्ये शुक्रवारी प्रचंड थंडीमुळे आर्क्टिक ब्लास्ट झाला आहे. यामुळे गेल्या ४२ वर्षांत जेवढे कमी तापमान नोंदविले गेले नाही ते आज झाले आहे. न्यू हैम्पशायरच्या माउंट वॉशिंग्टनमध्ये तापमान उणे 79 डिग्री सेल्सियसवर गेले आहे.
न्यू यॉर्कसह न्यू इंग्लंडमधील मॅसॅच्युसेट्स, कनेक्टिकट, र्होड आयलंड, न्यू हॅम्पशायर, व्हरमाँट आणि मेनमधील सुमारे 16 दशलक्ष लोकांना तापमानात घट होत असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या व्हरमाँटमध्ये तापमान -26°C आहे.
मेन राज्यात 1981 नंतर प्रथमच एवढी थंडी पडत आहे. येथे पारा -24 अंशांवर पोहोचला आहे. राज्यातील लोकांसाठी 150 निवारा केंद्र उघडण्यात आले आहेत. संपूर्ण भागात थंडी वाढल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शाळाही बंद करण्यात आल्या आहेत.
उत्तर ध्रुवाभोवतीचा भाग आर्क्टिक म्हणून ओळखला जातो. आर्क्टिक स्फोटात या भागातून थंड हवेचा मोठा गोळा कॅनडामार्गे अमेरिकेत पोहोचतो आणि अमेरिकेच्या बहुतांश भागात तापमानात अचानक घट नोंदवली जाते. या स्थितीत, तापमान काही तासांत 11 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त घसरू शकते. मैदानी भागात तापमान -57°C पर्यंत खाली येऊ शकते.