Ardi Rizal: बाबो! दोन वर्षांचा मुलगा दिवसाला ४० सिगारेट ओढायचा; व्यसन सुटले, आता दिसतो असा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 13:11 IST2021-12-27T13:03:54+5:302021-12-27T13:11:35+5:30
Ardi Rizal smoking baby in 2010: चेन स्मोकिंगमुळे अर्दीची हालत खूप बेकार झाली होती, त्याला सिगारेट मिळाली नाही तर तो भिंतीवर डोके आदळून घेत होता. २०१० मध्ये सिगारेट पितानाचा त्याचा फोटो जगभरात चर्चेचा विषय बनला होता.

Ardi Rizal: बाबो! दोन वर्षांचा मुलगा दिवसाला ४० सिगारेट ओढायचा; व्यसन सुटले, आता दिसतो असा...
जकार्ता : इंडोनेशियामध्ये केवळ दोन वर्षांचा मुलगा चेन स्मोकर बनला होता. तो दर दिवसाला ४० सिगारेट ओढत होता. या मुलाचे नाव अर्दी रिजाल आहे, तो सुमात्राचा राहणारा आहे. या मुलाने सात वर्षांपूर्वी जेव्हा सिगारेट ओढणे सोडले तेव्हा त्याचा पूर्ण चेहरा मोहराच बदलला. सिगारेटची घाणेरडी सवय सोडल्यानंतर त्याच्यात एवढा मोठा बदल झाला की, तो ओळखू येत नाहीय. जगभरात त्याच्या या प्रतापामुळे चर्चा होत आहे.
चेन स्मोकिंगमुळे अर्दीची हालत खूप बेकार झाली होती, त्याला सिगारेट मिळाली नाही तर तो भिंतीवर डोके आदळून घेत होता. २०१० मध्ये सिगारेट पितानाचा त्याचा फोटो जगभरात चर्चेचा विषय बनला होता. सिगारेट सोडण्याच्या कठीण प्रक्रियेनंतर अर्दीने व्यसन कायमचे सोडले. आता तो फळे, भाज्या आदी खातो. यामुळे त्याच्या शरीरात क्रांतीकारक बदल झाले आहेत.
बापाने सवय लावलेली
अर्दीने २०१७ मध्ये सीएनएनला मुलाखत दिली होती. तेव्हा त्याने व्यसन कसे सुटले याविषयी माहिती दिली. सिगारेट सोडणे माझ्यासाठी खूप कठीण होते. जर मी सिगारेच ओढली नाही तर माझ्या जिभेची चव खराब होत होती. माझे डोके गरगरायला लागायचे. पण सिगारेट सोडल्यानंतर मी आता खूश आहे. आधीपेक्षा जास्त उत्साही झालो आहे, ताजेतवाने वाटत आहे. माझ्या वडिलांनी मी १८ महिन्यांचा असताना मला पहिल्यांदा सिगारेट पाजली होती, असा खुलासा त्याने केला होता.
यानंतर अर्दीला जेव्हा सिगारेट मिळायची नाही तेव्हा तो डोके बदडवून घ्यायचा. यामुळे त्याच्या आईने डियाने ने सरकारच्या आयसीयू तज्ज्ञांची मदत मागितली होती. तेव्हा हा प्रकार जगासमोर आला. अर्दीची व्यसन सोडण्याची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा त्याने पहिल्यांदा सिगारेट मिळाली नाही म्हणून डोके भिंतीवर आदळले होते. वेडापिसा झाला होता, स्वत:लाच मारून घेत होता. यामुळे मला त्याला सिगारेट द्यावी लागायची. हळू हळू त्याची ही सवय मोडली आणि आता तो सिगारेट ओढत नाही भरपेट जेवतो, असे त्याच्या आईने सांगितले.