अमेरिकेला जाण्यासाठी अजूनही निर्बंध लागू आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 02:33 PM2021-04-17T14:33:11+5:302021-04-17T14:33:59+5:30

Are there still restrictions on traveling to the United States: अमेरिकेत येण्यापूर्वी प्रवाशांनी ते येत असलेल्या राज्यातील कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक सूचनांची माहिती घ्यावी. राज्यांनुसार क्वारंटिन आणि सेल्फ-आयसोलेशनचे नियम बदलतात.

Are there still restrictions on traveling to the United States | अमेरिकेला जाण्यासाठी अजूनही निर्बंध लागू आहेत का?

अमेरिकेला जाण्यासाठी अजूनही निर्बंध लागू आहेत का?

Next

उत्तर: अमेरिकेचं नागरिकत्व, अमेरिकेतील वास्तव्याची स्थिती आणि तुम्ही कुठून प्रवास करत आहात, या बाबींच्या आधारे काही विमान कंपन्या प्रवाशांना विमान प्रवासास मज्जाव करत आहेत. (Are there still restrictions on traveling to the United States)

अमेरिकेत राष्ट्रपतींनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी अद्यापही सुरू आहे. त्यामुळे शेंजेन प्रांत, युनायटेड किंग्डम, आर्यलंड, चीन, इराण, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधून आलेल्या प्रवाशांना अमेरिकेत १४ दिवस प्रवास करता येत नाही. अमेरिकेत येण्यापूर्वी प्रवाशांनी ते येत असलेल्या राज्यातील कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक सूचनांची माहिती घ्यावी. राज्यांनुसार क्वारंटिन आणि सेल्फ-आयसोलेशनचे नियम बदलतात. सध्याच्या मार्गदर्शन सुचनांची माहिती प्रत्येक राज्यानं आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. क्वारंटिन आणि चाचणी प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आजार सेंटर फॉर डिझिज कंट्रोल आणि प्रीव्हेंशनच्या संकेतस्थळाला (cdc.gov) भेट द्या.

अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी वैध, मुदत न संपलेला व्हिसा किंवा वैध मुदत न संपलेलं ग्रीन कार्ड आणि वैध पासपोर्ट आवश्यक आहे. तुमच्या व्हिसाची मुदत केव्हा संपते त्याची तारीख व्हिसावर छापण्यात आली आहे. जर तुमच्या व्हिसाची मुदत संपली नसेल तर तुम्हाला नव्या व्हिसाची गरज नाही. पण प्रवाशानं अमेरिकेचे इमिग्रेशन कायदे लक्षात घ्यावेतकेवळ वैध व्हिसाच्या आधारे अमेरिकेत प्रवेश मिळेल असं नाही. अमेरिकेत कोणाला आणि किती कालावधीसाठी प्रवेश द्यायचा याचा निर्णय अमेरिकेचे सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण अधिकारी घेतात.

अमेरिकेत दाखल झाल्यावर प्रवाशांना सीमाशुल्काशी संबंधित प्रक्रियेतून जावं लागतं. एन्ट्री स्क्रीनिंग पूर्ण करावी लागते. यावेळी प्रवाशांना त्यांच्या वैद्यकीय पार्श्वभूमी आणि सध्याची स्थिती यासंबंधी काही अतिरिक्त प्रश्न विचारले जातात. स्थानिक आरोग्य प्रशासनाला प्रवाशांशी संपर्क साधता यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक घेतला जातो. यासाठी थोडा जास्त वेळ लागतो.

अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांनी थेट व्यवसायिक विमान कंपन्याशी संपर्क साधावा. विमान प्रवासाच्या परवानगी संबंधीचे कोणतेही अधिकार मुंबईतील अमेरिकन दूतावासाकडे नाहीत. प्रवाशांना अमेरिकेत प्रवास करता यावा यासाठी दूतावास कोणतंही पत्र देत नाही.
मार्गदर्शक सूचना बदलू शकतात याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. प्रवासाबद्दलच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती मिळवण्यासाठी travel.state.gov या संकेतस्थळाला भेट द्या. भारताशी संबंधित मार्गदर्शक सूचनांसाठी in.usembassy.gov/covid-19-information/ हे संकेतस्थळ पाहा.

Web Title: Are there still restrictions on traveling to the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.