Danish Siddiqui: जिथे दानिश सिद्दीकींचा मृत्यू झाला, तो भाग तालिबानकडून परत मिळवला; अफगाणिस्तानचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 06:28 PM2021-07-17T18:28:55+5:302021-07-17T18:32:22+5:30
Danish Siddiqui Death: युद्ध क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या पत्रकारांनी आम्हाला सूचना देणे आवश्यक आहे. तसे केल्यास त्या व्यक्तीची विशेष काळजी घेणे सहज शक्य होईल. मात्र, पत्रकार आम्हाला सूचना न देताच युद्धभूमीत प्रवेश करत आहेत, या गोष्टीचा आम्हाला खेद आहे, असेही तालिबानने म्हटले आहे.
प्रतिष्ठित समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी (danish siddiqui) यांचा अफगाणिस्तानातील कंदाहारमध्ये सुरु असलेल्या अफगाणिस्तान-तालिबान संघर्षामध्ये (Afghan-Taliban War) मृत्यू झाला. यामुळे जगभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. ज्या भागात दानिश सिद्दीकींचा मृत्यू झाला तो भाग पत मिळविल्याचा दावा अफगाणिस्तान लष्कराने केला आहे. (Afghan forces capture area where danish siddiqui died in Afghan-Taliban War.)
दानिश सिद्दीकी हे अफगाण स्पेशल फोर्ससमवेत (Afghanistan) सोबत होते आणि तेथील तालिबानविरूद्ध त्यांच्या कारवायांचे वृत्तांकन करत होते. माध्यमांमध्ये वृत्त झळकताच या घटनेचा निषेध व्यक्त झाल्यानंतर तालिबानने यावर स्पष्टीकरण दिले होते. तसेच खेदही व्यक्त केला होता.
The Afghans of district “Speen Boldak” giving warm welcome to their forces after succeeded in safeguarding the people from terrorists.#StopAfghanBloodshedpic.twitter.com/o5ElZIOfGj
— Ihtesham Afghan (@IhteshamAfghan) July 16, 2021
अफगाणिस्तानमध्ये अफगाण सैन्यासोबत तालिबानविरोधी मोहीमेचे वृत्तांकन करत असताना गुरुवारी रात्री झालेल्या चकमकीत सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. दानिश सिद्दीक हे 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेचे दिल्ली ब्युरोतील मुख्य छायाचित्रकार पदावर कार्यरत होते. भारतात कोरोना या महारोगाची साथ पसरली असताना त्यांनी काढलेल्या छायाचित्रांतून कोरोना संकटाची दाहकता जगासमोर आली होती.
काबूल - भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानमध्ये मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमध्ये अफगाण सैन्यासोबत तालिबानविरोधी मोहीमेचे वृत्तांकन करत असताना झालेल्या चकमकीत सिद्दीकी यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती pic.twitter.com/5BHOyrdijX
— Lokmat (@MiLOKMAT) July 16, 2021
तालिबानचे प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद ने सीएनएन-न्यूज18 शी बोलताना म्हटले की, गोळीबाराच्या चकमकीत पत्रकार दानिश यांना कोणाची गोळी लागली, कशी लागली याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. दानिश यांच्या मृत्युचा आम्हाला खेद वाटतो, असेही मुजाहिद यांनी म्हटले आहे. तसेच, तालिबानमध्ये कव्हरेजसाठी येणाऱ्या इतर पत्रकारांना सल्लाही देण्यात आला आहे. युद्ध क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या पत्रकारांनी आम्हाला सूचना देणे आवश्यक आहे. तसे केल्यास त्या व्यक्तीची विशेष काळजी घेणे सहज शक्य होईल. मात्र, पत्रकार आम्हाला सूचना न देताच युद्धभूमीत प्रवेश करत आहेत, या गोष्टीचा आम्हाला खेद आहे, असेही तालिबानने म्हटले आहे.
अफगाणिस्तानचे राजदूत ममुंडजे यांचं ट्विट
अफगाणिस्तानचे राजदूत फरीद, ममुंडजे यांनी ट्विटरवरुन दानिशच्या मृत्यूसंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला. “काल रात्री कंदाहार येथे मित्र दानिश सिद्दीकीच्या हत्येच्या दु: खद बातमीने मनापासून दु: खी झाले. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय पत्रकार आणि पुलित्झर पुरस्कार विजेता दानिश अफगाण सुरक्षा दलासोबत होते, त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला ”असे त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.