खतरनाक कैद्याला किस करताना कॅमेरात कैद झाली महिला न्यायाधीश, फोटो झाला लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 01:56 PM2022-01-05T13:56:56+5:302022-01-05T14:03:53+5:30

Argentina : तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या क्रिस्टीयनला भेटायला गेलेली मारियल सुआरेजने त्याला मिठी मारली आणि किस केलं. ही घटना तुरूंगातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

Argentina : Female judge caught kissing convicted killer in jail she tried to save him from life sentence | खतरनाक कैद्याला किस करताना कॅमेरात कैद झाली महिला न्यायाधीश, फोटो झाला लीक

खतरनाक कैद्याला किस करताना कॅमेरात कैद झाली महिला न्यायाधीश, फोटो झाला लीक

Next

अर्जेंटिनामध्ये (Argentina) एक महिला न्यायाधीश वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महिला न्यायाधीश तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या एका पोलिसवाल्याला भेटायला गेली होती. यावेळी तरूंगातच ती त्या पोलिसवाल्याला किस (Judge Caught Kissing) करताना कॅमेरात कैद झाली. इतकंच नाही तर महिलेने या दोषी पोलिसवाल्याला जन्मठेपेच्या शिक्षेतून वाचवण्याचा प्रयत्नही केला. 

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, ही घटना २९ डिसेंबर दुपारी अर्जेंटिनाच्या दक्षिण Chubut प्रांतातील एका तरूंगातील आहे.  तुरूंगात न्यायाधीश मारियल सुआरेज हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या क्रिस्टीयन बस्टोसला भेटायला गेली होती. क्रिस्टीयन हा एक पोलीस कर्मचारी होता. त्याने त्याच्या सहकाऱ्याची गोळी झाडून हत्या केली होती. 

तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या क्रिस्टीयनला भेटायला गेलेली मारियल सुआरेजने त्याला मिठी मारली आणि किस केलं. ही घटना तुरूंगातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. हे फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या घटनेनंतर आता सुआरेजला प्रश्न विचारले जात आहेत. आता तिच्या विरोधात चौकशी सुरू झाली आहे.

जन्मठेपेच्या शिक्षेपासून वाचवलं

इतकंच नाही तर मारियल सुआरेजने दोषी क्रिस्टीयनला जन्मठेपेच्या शिक्षेपासून वाचवण्याचा प्रयत्नही केला होता. क्रिस्टियनच्या केसच्या सुनावणीवेळी न्यायाधीशांचं एक पॅनल बसलं होतं. त्यांना ठरवायचं होतं की, क्रिस्टियनने २००९ मध्ये झालेल्या हत्ये प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा द्यायची की नाही. या पॅनलमध्ये सुआरेज एकमेव न्यायाधीश होती, जिने क्रिस्टीयनला जन्मठेपेची शिक्षा न देण्यासाठी मत दिलं होतं.

न्यायाधीश सुआरेजला सांगण्यात आलं होतं की, क्रिस्टियन एक खतरनाक कैदी आहे. तरीही तिने त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विरोध केला होता. तर इतर न्यायाधीशांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यासाठी मत दिलं होतं आणि क्रिस्टीयनला आयुष्यभरासाठी तुरूंगात पाठवलं. क्रिस्टीयनची जन्मठेपेची शिक्षा गेल्याच आठवड्यात सुरू झाली आहे.
 

Web Title: Argentina : Female judge caught kissing convicted killer in jail she tried to save him from life sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.