किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत तर्कवितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 05:34 AM2020-04-27T05:34:15+5:302020-04-27T05:34:49+5:30
38 नॉर्थया उत्तर कोरियाबाबत अध्ययन करणा-या वेबसाइटने ही छायाचित्रे जारी केली आहेत. यातून किम यांच्या प्रकृतीबाबत मात्र काहीही संकेत मिळत नाहीत.
सियोल : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग ऊन हे सध्या कुठे आहेत आणि त्यांची प्रकृती कशी आहे? याबाबत सध्या तरी कोणीही ठामपणे काही
सांगू शकत नाही. त्यांच्या प्रकृतीबाबत तर्कवितर्क केले जात असताना त्यांची रेल्वे आठवड्यापासून देशाच्या पूर्व किनाऱ्यालगत त्यांच्या परिसरात उभी असलेली दिसून आली होती. 38 नॉर्थया उत्तर कोरियाबाबत अध्ययन करणा-या वेबसाइटने ही छायाचित्रे जारी केली आहेत. यातून किम यांच्या प्रकृतीबाबत मात्र काहीही संकेत मिळत नाहीत. मात्र, यातून दक्षिण कोरियाच्या गुप्तचर समितीच्या विधानाला पुष्टी मिळते की, किम हे राजधानी प्योंगयांगच्या बाहेरील भागात आहेत. उत्तर कोरियाने मात्र किम यांची प्रकृती खराब असल्याचे वृत्त यापूर्वीच फेटाळून लावले आहे. 15 एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात किम सहभागी झाले नाहीत. उत्तर कोरियाचे संस्थापक आणि आपले आजोबा किम इल सुंग यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. किम यांच्या आरोग्याचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, अशीही काळजी आहे की, ते गंभीर आजारी पडल्याने किंवा काही वाईट घटना घडल्याने उत्तर कोरियात अस्थिरता निर्माण होऊ शकते. 21 एप्रिल रोजी किम यांची रेल्वे पूर्व किना-यालगत पोहोचली आणि २३ एप्रिलपर्यंत तिथेच होती, असे या वेबसाईटने म्हटले आहे. मात्र, यावरून किम तिथेच आहेत, असेही छातीठोकपणे म्हणता येत नाही.