ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी हल्ला; 7 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
By सायली शिर्के | Published: November 3, 2020 08:24 AM2020-11-03T08:24:33+5:302020-11-03T08:37:46+5:30
Austria Terror Attack : दहशतवादी हल्ल्यामध्ये हल्लेखोरासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यामध्ये हल्लेखोरासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी रात्री ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळीबार करण्यात आला आहे. डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एका हल्लेखोराचा देखील समावेश आहे.
व्हिएन्ना पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच जखमींमध्ये अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. एका संशयिताला ठार करण्यात यश आलं असल्याची माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे. संशयितांकडून रायफल्सच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गोळीबार होण्यास सुरुवात झाली. सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळीबार केला जात होता.
CONFIRMED at the moment:
— POLIZEI WIEN (@LPDWien) November 2, 2020
*08:00 pm: several shots fired, beginning at Seitenstettengasse
*several suspects armed with rifles
*six different shooting locations
* one deceaced person, several injured (1 officer included)
*1 suspect shot and killed by police officers #0211w
दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांनी लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यापासून दूर राहा असंही म्हटलं आहे. ऑस्ट्रियाच्या गृहमंत्र्यांनी हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असून लोकांना घऱाबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. तसेच संशयित दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या विशेष दलांना बोलावण्यात आल्याची माहिती दिली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Vienna public Transports do not stop in the 1st district until further notice! Stay inside and way from public places!
— POLIZEI WIEN (@LPDWien) November 2, 2020
BREAKING: Reports of a shooting at a #Vienna synagogue with casualties. This is a video from the scene. My heart is caught in my throat and I am praying for all involved. pic.twitter.com/YomV3QBVQj
— Aviva Klompas (@AvivaKlompas) November 2, 2020
अफगानिस्तानच्या काबुल विद्यापीठावर दहशतवाद्यांचा हल्ला, 10 जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानमधील काबूल विद्यापीठावर याआधी दहशतवाद्यांनी हल्ला केला असून हल्ल्यात जवळपास दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. दहशतवाद्यांनी विद्यार्थ्यांना लक्ष्य करुन त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात 40 जण जखमी झाले. विद्यापीठ परिसरात घुसलेल्या दहशतवाद्यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात खळबळ माजली होती.