लष्कर, आयएसआयने राजकारणापासून दूर राहावे - सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 04:56 AM2019-02-07T04:56:34+5:302019-02-07T04:56:54+5:30

पाकिस्तानी लष्करातील कोणीही राजकारणात सहभागी होण्यावर तेथील सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे, तसेच आयएसआयसारख्या गुप्तचर संस्थांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे, असा आदेशही दिला आहे.

Army, ISI should stay away from politics - Supreme Court | लष्कर, आयएसआयने राजकारणापासून दूर राहावे - सुप्रीम कोर्ट

लष्कर, आयएसआयने राजकारणापासून दूर राहावे - सुप्रीम कोर्ट

Next

इस्लामाबाद  - पाकिस्तानी लष्करातील कोणीही राजकारणात सहभागी होण्यावर तेथील सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे, तसेच आयएसआयसारख्या गुप्तचर संस्थांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे, असा आदेशही दिला आहे. द्वेष, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे न्यायालयानेपाकिस्तान सरकारला बजावले आहे.

पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत लष्कराने दिलेल्या पाठिंब्यामुळेच इम्रान खान यांचा पक्ष विजयी झाला, अशी चर्चा होती. १९४७ साली भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानात लोकशाही सरकारे अस्तित्वात आली, पण ती फार काळ टिकू शकली नाहीत. याचे कारण लष्कराचा तेथील राजसत्तेवर अंकुश आहे. (वृत्तसंस्था)

घातपाती कारवाया

तिथे काही वेळेस सरकारे उलथवून लष्करशहांनी सत्ता काबीज केली होती. आयएसआय या गुप्तचर संघटनेने दहशतवाद्यांना हाताशी धरून भारत, अफगाणिस्तानात घातपाती कारवाया सुरू ठेवल्या आहेत. या सर्व गोष्टींना चाप लागल्याशिवाय पाकिस्तानात लोकशाही व्यवस्थितरीत्या नांदू शकणार नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निकालाला महत्त्व आहे.

Web Title: Army, ISI should stay away from politics - Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.