लष्करी विमान कोसळून २२ ठार
By admin | Published: March 17, 2016 12:30 AM2016-03-17T00:30:31+5:302016-03-17T00:30:31+5:30
एक्वाडोरचे एक लष्करी विमान अमेझॉन पर्जन्यवनात कोसळून त्यातील सर्व २२ जण ठार झाले. राष्ट्राध्यक्ष राफेल कोरिया यांनी टिष्ट्वटरवर ही माहिती दिली. या दुर्घटनेतून कोणीही
क्विटो : एक्वाडोरचे एक लष्करी विमान अमेझॉन पर्जन्यवनात कोसळून त्यातील सर्व २२ जण ठार झाले. राष्ट्राध्यक्ष राफेल कोरिया यांनी टिष्ट्वटरवर ही माहिती दिली. या दुर्घटनेतून कोणीही वाचू शकले नाही. ही एक शोकांतिका आहे. विमानात निमलष्करी दलाचे १९ जवान, दोन वैमानिक तसेच एक तंत्रज्ञ होता, असेही त्यांनी टिष्ट्वटरवरून सांगितले.
विमान पेरूच्या सीमेलगत असलेल्या पस्ताजा प्रांतात कोसळले. दुर्घटनास्थळी जात आहोत, असे संरक्षणमंत्री रिकार्डो पॅटिनो यांनी सांगितले. जनरल लुईस कास्त्रो अवशेष गोळा करण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत. आपल्या बंधूंच्या मृत्यूने देशातील प्रत्येक जण दु:खी आहे, असे टिष्ट्वट पॅटिनो यांनी केले आहे. हे विमान जवानांना पॅराशूट प्रशिक्षणासाठी नेत होते. उड्डयन विद्यालयाचे विद्यार्थी जेसी ग्वेरा यांनी सांगितले. विमानाचे पंख परिसरात विखुरले आहेत. २००९ पासून चार दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानामध्ये राष्ट्राध्यक्षांच्या विमानाचाही समावेश आहे