लष्कर ए तोयबा, जमात उद दवाकडून सामूहिक संहारक शस्त्रस्त्रंचा शोध

By admin | Published: June 30, 2014 12:32 AM2014-06-30T00:32:07+5:302014-06-30T00:32:07+5:30

2क्क्8 च्या मुंबई हल्ल्यानंतर या संघटना अधिक प्रबळ झाल्या असल्याचे एका नव्या पुस्तकात म्हटले आहे.

Army A Taiba, search of mass killer weapon from Jamaat ud-Dawa | लष्कर ए तोयबा, जमात उद दवाकडून सामूहिक संहारक शस्त्रस्त्रंचा शोध

लष्कर ए तोयबा, जमात उद दवाकडून सामूहिक संहारक शस्त्रस्त्रंचा शोध

Next
>वॉशिंग्टन : पाकिस्तानातील लष्कराचे साहाय्य असणा:या लष्कर ए तोयबा व जमात उद दवा या दहशतवादी संघटना सामूहिक संहाराची शस्त्रस्त्रे मिळविण्याचा प्रयत्न करीत असून, 2क्क्8 च्या मुंबई हल्ल्यानंतर या संघटना अधिक प्रबळ झाल्या असल्याचे एका नव्या पुस्तकात म्हटले आहे. लष्कर व जमात उद दवा हवाई व आरमारी ताकद वाढवत आहेत, असेही या पुस्तकात म्हटले आहे. 
जमात उद दवा हवाई व आरमारी ताकद वाढवत आहेत हे सर्वश्रुत आहे; पण ही संघटना व तिची सहायक संघटना लष्कर ए तोयबा सामूूहिक संहारक शस्त्रस्त्रे मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत ही बाब मात्र फारशी उजेडात आलेली नाही, असे अमेरिकेतील पाकिस्तानी लेखक अरिफ जमाल यांनी नव्या पुस्तकात म्हटले आहे.  कॉल्स ऑन ट्रान्सनॅशनल जिहाद: लष्कर ए तोयबा 1985 ते 2क्14 असे या पुस्तकाचे नाव आहे. जमात उद दवाला अणू तंत्रज्ञान हवे असून, ते मिळविताना  पाकिस्तान सरकारच्या विरोधात जायचे नाही, असे या संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याने ठरविले आहे. जमात उद दवा शिस्तबद्धरीत्या व थंड डोक्याने लवकरच अशी शस्त्रस्त्रे मिळविल, असे त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे. हे पुस्तक 26क् पानांचे आहे. (वृत्तसंस्था)
 
जमात उद दवा दहशतवादी संघटना 
अमेरिकेने जमात उद दवा ही पाकिस्तानी संघटना व तिच्या सहायक संघटना दहशतवादी असल्याचे गेल्या आठवडय़ात जाहीर केले असून, त्यांच्या अमेरिकेतील मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला आहे. जमात उद दवाचा नेता हाफिज सईदवर अमेरिकेने 1 कोटी डॉलर्सचे बक्षीस लावले आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी पाक सरकारने जिहादी संघटनांचा वापर केला आहे. त्यामुळेच 2क्क्8 च्या मुंबई हल्ल्यानंतरही हाफिज सईद पाकिस्तानात मुक्तपणो फिरत असून, त्याच्या संघटनाही चालू आहेत. मुंबई हल्ल्यानंतर लष्कर व जमात उद दवा अधिकच प्रबळ झाल्याचे दिसत आहे. 

Web Title: Army A Taiba, search of mass killer weapon from Jamaat ud-Dawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.