श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स यांना मागे टाकत अरनॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 04:43 AM2019-07-19T04:43:09+5:302019-07-19T04:43:27+5:30
श्रीमंत म्हणून बहुमान मिळविलेले तसेच या यादीत नंबर २ पेक्षा कधीही खाली न आलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (अमेरिका) यांना यंदा दिग्गजांनी मागे टाकले आहे.
ब्लूमबर्ग : गत सात वर्षांपासून जगातील सर्वात श्रीमंत म्हणून बहुमान मिळविलेले तसेच या यादीत नंबर २ पेक्षा कधीही खाली न आलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (अमेरिका) यांना यंदा दिग्गजांनी मागे टाकले आहे. त्यामुळे बिल गेट्स श्रीमंतांच्या यादीत तिसºया क्रमांकावर गेले आहेत.
ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट हे दुसºया क्रमांकावर पोहोचले आहेत. तर, श्रीमंतांच्या यादीत क्रमांक एकवर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस (अमेरिका) यांचे वर्चस्व कायम आहे.
बर्नार्ड अरनॉल्ट हे फ्रान्समधील लग्झरी गुड्स कंपनी एलव्हीएमएचचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. ७० वर्षीय अरनॉल्ट यांची कंपनी फ्रान्समधील चर्चित कंपनी आहे. १९८४ मध्ये त्यांनी लग्झरी गुड्स मार्केटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी टेक्सटाइल ग्रुपचेही अधिग्रहण केले.
संगणक क्षेत्रात मोठा दबदबा असलेले बिल गेट्स यांनी आपली ३५ बिलियन डॉलरची संपत्ती बिल अॅण्ड मिलिंदा गेट्स फाउंडेशनला दान केलेली आहे. अन्यथा आजही ते जगातील क्रमांक एकचे श्रीमंत व्यक्ती असले असते.
तथापि, बेजोस यांनी घटस्फोटानंतर पत्नीला दिलेल्या मोठ्या रकमेनंतरही ते जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या यापूर्वीच्या पत्नी मॅकेन्जी बेजोस या सध्या जगातील चौथ्या सर्वात श्रीमंत महिला आहेत.
>आकडे काय सांगतात?
ताज्या आकडेवारीनुसार, बर्नार्ड अरनॉल्ट यांची संपत्ती १०८ बिलियन डॉलरवर (७.४५ लाख कोटी) पोहोचली आहे. बिल गेट्स यांची
संपत्ती १०७.६ बिलियन डॉलर (७.३८ लाख कोटी) आहे. प्रथम क्रमांकावर असलेल्या जेफ बेजोस यांची संपत्ती १२५ बिलियन डॉलर (८.६२ लाख कोटी) आहे.ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, या यादीत ज्या ५०० श्रीमंतांचा समावेश आहे त्यात एकटे अरनॉल्ट असे आहेत ज्यांनी कमी कालावधीत हा टप्पा गाठला आहे.