विशेष केशरचनेसाठी ‘ऑस्कर’कडून आर्नोल्डचा गौरव; शाळेतही केस राखण्याचा आग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 11:21 PM2020-03-07T23:21:14+5:302020-03-07T23:23:04+5:30
हक्कासाठी उभे राहिल्याबाबत अकादमीकडून कौतुक
त्याच्या डोक्यावर वर्षानुवर्षे करकचून बांधलेल्या केसांच्या बटा आहेत. नेहमीच आपल्या आवडत्या पद्धतीने केस बांधून, शाळेचा गणवेश परिधान करण्याचा नियम पाळूनच तो हजर राहत असे. त्याचे केस खांद्यावर, डोळ्यांच्या वर आणि डोळ्यांवर येणार नाहीत, असे असतात.
माझे केस माझ्यासाठी खरोखर महत्त्वाचे आहेत. माझे वडील त्रिनिदादचे आहेत. अशा प्रकारची केशरचना आमच्या संस्कृतीचा भाग आहे. माझी इच्छा आहे की, शाळा अन्य संस्कृतींसाठीही खुली असावी. आम्हाला काही गोष्टी सांगण्याचा अधिकार असला पाहिजे. आमची मुस्काटदाबी होऊ नये, असे अर्नोल्ड याचे म्हणणे आहे.
डीगनेरेस या संस्थेने अर्नोल्डला नुकतेच एका कार्यक्रमात भाषण करण्यासाठी बोलाविले होते. त्याने स्वत:च्या हक्कांसाठी उभे राहून महत्त्वाच्या विषयाबद्दल जागरूकता निर्माण केली. त्याबद्दल या १८ वर्षांच्या मुलास कॉलेज शिक्षणासाठी २०,००० डॉलर्सची शिष्यवृत्ती देण्यात आली. आता या मुलास अकादमी पुरस्कारांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. ‘हेअर लव्ह’ या शॉर्ट अॅनिमेटेड चित्रपटाच्या चमूला पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. अभिनेता गॅब्रिएल युनियनसोबत हेअर लव्हची निर्मिती ड्वेन वेड यांनी केली आहे. त्यांनी अर्नोल्डला एक व्हिडीओ संदेश पाठवून सांगितले की, तू ज्या प्रकारे वागलास, ते आम्हाला आवडले. आम्हाला तुझ्यासाठी काहीतरी करायचे होते.
२०२० अकादमी पुरस्कारांमध्ये तू आणि तुझी आई सँडी हे हेअर लव्हच्या आॅस्कर - नामांकन असलेल्या संघाचे अधिकृत अतिथी आहात. आम्ही सर्वजण आपल्या कथेतून प्रेरित झालो आहोत. स्वत:च्या हक्कांसाठी उभे राहिल्याबद्दल आणि शाळेतही नैसर्गिक केस राखण्याच्या आग्रही हक्काबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत.
मुख्याध्यापकांनी दिली तंबी
लांबलचक केस कापले पाहिजेत. तसे केले नाही, तर शाळेच्या पदवीदान समारंभात भाग घेऊ शकणार नाही, अशी तंबी मुख्याध्यापकाने एका किशोरवयीन मुलाला दिली होती. डीएन्ड्रे आर्नोल्ड असे त्याचे नाव. याचकिशोरवयीन मुलास हक्कांसाठीच्या संघर्षाबद्दल नुकतेच ऑस्कर सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे.