राष्ट्रपती मुखर्जींचे चीनमध्ये आगमन
By admin | Published: May 25, 2016 01:07 AM2016-05-25T01:07:21+5:302016-05-25T01:07:21+5:30
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चार दिवसांच्या चीन भेटीवर मंगळवारी येथे आगमन झाले. उभय देशांतील राजकीय व आर्थिक संबंध वृद्धिंगत करणे, तसेच संयुक्त
Next
गुआंगझोवू : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चार दिवसांच्या चीन भेटीवर मंगळवारी येथे आगमन झाले.
उभय देशांतील राजकीय व आर्थिक संबंध वृद्धिंगत करणे, तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे भारताला सदस्यत्व मिळू न देण्यास चीनचा असलेला विरोध आणि जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर करण्याच्या युनोच्या प्रयत्नांमध्ये चीनने आणलेली आडकाठी हे विषय या दौऱ्यात चर्चेत असतील.
राष्ट्रपती या नात्याने मुखर्जी प्रथमच चीनला भेट देत आहेत. त्यांचे गुरुवारी बीजिंगमध्ये आगमन होईल. तेथे त्यांची अध्यक्ष शी जिनपिंग व इतर चिनी नेत्यांशी भेट होईल.