आर्टिक्टवरील बर्फ वितळणार

By admin | Published: May 11, 2017 12:27 AM2017-05-11T00:27:06+5:302017-05-11T00:27:06+5:30

जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळू लागल्या आहेत. गेल्या काही वर्षांच त्यांच्या वितळण्याचा वेगही खूपच वाढला आहे.

Articulated snow melts | आर्टिक्टवरील बर्फ वितळणार

आर्टिक्टवरील बर्फ वितळणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळू लागल्या आहेत. गेल्या काही वर्षांच त्यांच्या वितळण्याचा वेगही खूपच वाढला आहे. आमच्या हिमनद्या हळूहळू अस्तंगत होण्याकडे वाटचाल करीत असल्याचे आतापर्यंत म्हटले जात होते; मात्र आता कळले आहे की, हा वेग आपण समजत होतो त्याहून अधिक आहे. आकडेवारी भीतिदायक आहे. १९७५ ते २०१२ दरम्यान आर्टिक्ट बर्फाची जाडी ६५ टक्क्यांनी घटली आहे.
दोन्ही धु्रव आणि उष्णकंटीबंधीय प्रदेशांमध्ये तापमानात असलेल्या फरकामुळे पृथ्वीच्या मोठ्या भूभागात वारे वाहतात. जर आर्टिक्टचे तापमान उष्णकटीबंधीय प्रदेशाच्या तुलनेत वेगाने वाढले, तर पृथ्वीवर अनपेक्षित ठिकाणी अवकाळी उष्णतेची लाट येईल आणि हा मानवी जीवनासाठी चिंतेचा विषय आहे.
आर्टिक्टच्या पर्माफ्रॉस्टमध्ये (बर्फाने झाकलेला मातीचा थर) मोठ्या प्रमाणात जैवपदार्थ आहेत. बर्फ वितळल्यामुळे हे पदार्थ उष्णतेने जळून कॉर्बन डायक्साईड किंवा मिथेनच्या रूपात वातावरणात मिसळतील. त्यामुळे जागतिक तापमानवाढ आणखी तीव्र होईल.
आर्टिक्टच्या ग्रीनलॅण्ड पट्ट्यात पृथ्वीच्या दहा टक्के गोडे पाणी आहे. जर तेथील बर्फ वितळला तर समुद्राची पाणीपातळी या शतकाच्या अखेरीस ७४ से. मी. हूनही अधिक वाढेल. ही बाब समुद्रकिनारी वसलेल्या शहरांसाठी धोकादायक ठरू शकते.
मानवाने गेल्या एका शतकात निसर्गात जेवढी ढवळाढवळ केली तेवढी यापूर्वी कधीही झाली नव्हती. याच एका शतकात जगाची लोकसंख्याही खूप वेगाने वाढली. मानवाने आपल्या गरजांसाठी अनेक शोध लावून निसर्गात एवढी ढवळाढवळ केली की, पर्यावरणाचे संतुलनच बिघडून गेले.
जगभरातील हवामानात बदल घडतील-
तापमानवाढीमुळे तीन दशकांत आर्टिक्टवरील बर्फाचे क्षेत्रफळ जवळपास निम्मे झाले आहे. आर्टिक्टकौन्सिलचा ताजा अहवाल स्नो, वॉटर, आइस, पर्माफ्रॉस्ट इन द आर्टिक्टनुसार, बर्फ वितळण्याचा वेग पाहता २०४० पर्यंत आर्टिक्टवरील बर्फ पूर्णपणे वितळून जाईल.
आर्टिक्टवरील बर्फ २०७० पर्यंत वितळून जाईल, असा अंदाज पूर्वी व्यक्त करण्यात येत होता; मात्र हवामानातील असामान्य बदलामुळे ही दुर्दैवी वेळ लवकर येईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
गेल्या सात मार्च रोजी आर्टिक्टवरील बर्फाचे प्रमाण अत्यंत कमी होते. तज्ज्ञांच्या मते, तापमानवाढीमुळे येत्या काही वर्षांत जगभरातील हवामानात भयंकर बदल दिसतील.
आर्टिक्टवरील बर्फ वितळल्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात अनेक भयंकर बदल घडून येऊ शकतात. हा अहवाल आंतरराष्ट्रीय नियतकालिक द इकोनॉमिस्टमध्ये प्रकाशित झाला आहे.

Web Title: Articulated snow melts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.