कृत्रिम गर्भधारणेत डॉक्टरने स्वत:चे स्पर्म्स वापरुन केली महिलेची फसवणूक
By admin | Published: November 4, 2016 12:24 PM2016-11-04T12:24:54+5:302016-11-04T12:34:25+5:30
नैसर्गिक गर्भधारणा होत नसल्याने त्यांनी कृत्रिम गर्भधारणेचा निर्णय घेतला. त्यावेळी डॉ. बारविन यांनी..
Next
ऑनलाइन लोकमत
ओटावा, दि. ४ - नैसर्गिक गर्भधारणा शक्य नसलेल्या महिलांमध्ये कृत्रिमपद्धतीने गर्भधारणा घडवून आणणा-या एका प्रसूतीरोग तज्ञ डॉक्टरने महिलेच्या गर्भामध्ये तिच्या नव-याऐवजी स्वत:चे स्पर्म सोडून महिलेला गर्भवती केल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे मुलीच्या जन्मानंतर तब्बल २७ वर्षांनी हा प्रकार उघड झाला आहे.
कॅनडातील ओटावा शहरात रहाणा-या डॅनियल आणि दाविना डिक्सॉन दाम्पत्याने १९८९ साली डॉ. नॉरमॅन बारविन यांच्या फर्टीलिटी क्लिनिकमध्ये नाव नोंदवले होते. दाविना यांना नैसर्गिक गर्भधारणा होत नसल्याने त्यांनी कृत्रिम गर्भधारणेचा निर्णय घेतला. त्यावेळी डॉ. बारविन यांनी डॅनियलच्या स्पर्मचे नमुने घेतले होते.
पण गर्भधारणा घडवून आणताना डॉ. बारविनने डॅनियलऐवजी स्वत:चे स्पर्म वापरले असा आरोप दाविना यांनी केला आहे. डिक्सॉन दांम्पत्याने या प्रकरणी ऑनतारीयो कोर्टात डॉ. बारविन विरोधात खटला दाखल केला आहे. रिबेका आता २६ वर्षांची असून डॅनियल तिचे बायोलॉजिकल पिता असल्याचा दाविनाचा समज होता.
फेब्रुवारी महिन्यात दाविनाने एक फेसबुक पोस्ट वाचली. त्यामध्ये एका जोडप्याचे डोळे निळया रंगाचे होते. पण त्यांच्या मुलाच्या डोळयांचा रंग वेगळा होता. त्यावरुन दाविनाच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. कारण दाविना आणि डॅनियलच्या डोळयांचा रंग निळा होता पण रिबेकाच्या डोळयाचा रंग वेगळा होता.
संशय मिटवण्यासाठी त्यांनी कुटुंबाची डिएनए चाचणी केली. त्यात डॅनियल रिबेकाचे खरे पिता नसल्याचे स्पष्ट झाले. हे कसे घडले याचा शोध घेण्यासाठी दाविनाने डॉ. बारविनचा इतिहास तपासला. त्यामध्ये कुत्रिम गर्भधारणेच्या एका प्रकरणात डॉ. बारविनवर काही आरोप होते. डॉ. बारविनने तीन महिलांमध्ये चुकीचे स्पर्म सोडले होते. त्यामुळे अखेर डिक्सॉन कुटुंबाने डॉ.बारविन विरोधात न्यायालयात खटला भरला.