'त्या' कलाकाराने मॅनहोलची बनवली रुम
By admin | Published: April 11, 2016 12:08 PM2016-04-11T12:08:22+5:302016-04-11T12:08:22+5:30
बियानकोशॉक या स्ट्रीट आर्टीस्टने 'बॉर्डरलाईफ' या कलात्मक संकल्पनेतून डोक्यावर छप्पर नसलेल्या बेघर नागरीकांच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मिलान, दि. ११ - बियानकोशॉक या स्ट्रीट आर्टीस्टने 'बॉर्डरलाईफ' या कलात्मक संकल्पनेतून डोक्यावर छप्पर नसलेल्या बेघर नागरीकांच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. बियानकोशॉकने इटलीच्या मिलान शहरातील दुर्लक्षित मॅनहोल्समध्ये छोटया रुम बनवल्या आहेत.
या तीन रुम्समध्ये किचन, बाथरुम आणि लिव्हींग रुम आहे. मॅनहोलची जागा छोटी असली तरी ती कलात्मक पद्धतीने सजवली आहे. छोटया घरामध्ये रहाणारेही आपल्या घराला नीटनेटके ठेवण्याचा कसा प्रयत्न करतात ते दाखवण्याचा प्रयत्न या कलात्मकतेतून करण्यात आला आहे.
रोमानिया बुचारेस्टमध्ये वाढत्या बेघर नागरीकांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी बियानकोशॉकने मॅनहोल्सचा वापर केला आहे. रोमानियामध्ये ६०० लोक मलवाहिनीजवळ रहातात.