‘अरुणाचल’वरून भारताशी मतभेद हे ‘कटू सत्य’-चीन

By admin | Published: April 10, 2015 01:19 AM2015-04-10T01:19:26+5:302015-04-10T01:19:26+5:30

दोन्ही पक्षांनी सीमा प्रश्नावर चर्चेसाठी पोषक वातावरण निर्माण करायला हवे, अशी आमची भूमिका आहे.’’ अरुणाचलची १,१२७ कि.मी. लांबीची सीमा

'Arunachal' disagreements with India 'bitter truth' - China | ‘अरुणाचल’वरून भारताशी मतभेद हे ‘कटू सत्य’-चीन

‘अरुणाचल’वरून भारताशी मतभेद हे ‘कटू सत्य’-चीन

Next

बीजिंग : अरुणाचल प्रदेशवरून भारताशी मतभेद हे एक कटू सत्य असल्याचे गुरुवारी सांगून चीनने सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा उकरून काढला. त्याचबरोबर या मुद्यावर तोडग्याकरिता संयुक्तपणे पोषक वातावरण निर्माण करायला हवे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांशी सहमत असल्याची पुश्तीही जोडली.
भारताने अरुणाचल प्रदेशातील सशस्त्र दल विषेधाधिकार कायद्याची (आफ्सपा) मुदत वाढविल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग म्हणाल्या की, ‘चीन- भारत सीमा मुद्यावर चीनने आपली भूमिका नेहमी स्पष्ट मांडली.
दोन्ही पक्षांनी सीमा प्रश्नावर चर्चेसाठी पोषक वातावरण निर्माण करायला हवे, अशी आमची भूमिका आहे.’’ अरुणाचलची १,१२७ कि.मी. लांबीची सीमा चीनलगत तर ५२० कि.मी. लांबीची सीमा म्यानमारला लागून आहे. चीन अरुणाचल हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे सांगत त्यावर दावा करतो. (वृत्तसंस्था)
 

Web Title: 'Arunachal' disagreements with India 'bitter truth' - China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.