ट्रम्प जिंकताच कट्टर विरोधकाने पत्नी, एक्स पत्नीसह मुलांवर गोळ्या झाडल्या; स्वत:चेही आयुष्य संपविले 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 04:59 PM2024-11-11T16:59:35+5:302024-11-11T17:00:16+5:30

अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ही घटना आहे. या व्यक्तीने आपली पत्नी, माजी पत्नी आणि दोन मुलांना गोळ्या झाडून त्यांचा जीव घेतला आहे.

As donald Trump Wins Hard Opponent Shoots Wife, Ex-Wife & Kids in america; He also ended his life  | ट्रम्प जिंकताच कट्टर विरोधकाने पत्नी, एक्स पत्नीसह मुलांवर गोळ्या झाडल्या; स्वत:चेही आयुष्य संपविले 

ट्रम्प जिंकताच कट्टर विरोधकाने पत्नी, एक्स पत्नीसह मुलांवर गोळ्या झाडल्या; स्वत:चेही आयुष्य संपविले 

डोनाल्ड ट्रम्प यांना एवढा विरोध की अमेरिकेतील एका व्यक्तीने आपल्याच कुटुंबाला गोळ्या झाडून संपविले आणि नंतर स्वत:ही आत्महत्या केली. सोशल मीडियावर सातत्याने ट्रम्प यांच्या विरोधात हा व्यक्ती पोस्ट टाकत होता. ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत विजय होताच या व्यक्तीने हे पाऊल उचलले आहे. 

अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ही घटना आहे. या व्यक्तीने आपली पत्नी, माजी पत्नी आणि दोन मुलांना गोळ्या झाडून त्यांचा जीव घेतला आहे. यानंतर त्यानेही आपले आयुष्य संपविले आहे. या व्यक्तीचे नाव अँथनी नेफ्यू असे आहे. पोलिसांनुसार अँथोनी हा ट्रम्प यांचा कट्टर विरोधक होता. तो मानसिकरित्या आजारी देखील होता. पोलिसांना दोन घरांमध्ये पाच लोकांचा मृतदेह सापडला आहे. 

धक्कादायक म्हणजे अँथनीने आधी एक्स पत्नीच्या घरी जात तिला आणि मुलाला संपविले. एरिन अब्रामसन (47) आणि जैकब नेफ्यू (15) असे त्यांचे नाव आहे. दोघांचाही मृत्यू बंदुकीच्या गोळ्या लागून झाला आहे. या दोघांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी पोलीस अँथनीच्या घरी गेले तेव्हा पोलिसांना धक्का बसला. अँथनीच्या घरात देखील तिघांचे मृतदेह पडलेले होते. अँथनीने त्याची ४५ वर्षीय पत्नी कैथरीन नेफ्यू आणइ सात वर्षांचा मुलगा ओलिवर यांना गोळ्या झाडल्या होत्या. अँथनीचा मृतदेहही घरातच पोलिसांना मिळाला. 
 

Web Title: As donald Trump Wins Hard Opponent Shoots Wife, Ex-Wife & Kids in america; He also ended his life 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.