युद्धविराम संपताच पुन्हा युद्ध! हमासनं केलं शांतीचं आवाहन, इस्रायल म्हणाला सोडणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 01:53 PM2023-11-29T13:53:08+5:302023-11-29T13:54:16+5:30
गाझा पट्टीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून हवाई हल्ले झालेले नाहीत. यामुळे येथे जनजीवन लवकरच पूर्वपदावर येईल, अशी आशा येथील लोकांना आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात शांततेसाठी युद्धविरामावर सहमती झाली होती. यामुळे गुरुवारपर्यंत (29 नोव्हेंबर) युद्ध अथवा हल्ले बंद आहेत. या युद्धविरामादरम्यान हमास आपल्या कैदत असलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका करत आहे. तर इस्रायल आपल्या कारागृहात बंद असलेल्या पॅलेस्टाइनच्या कैद्यांची सुटका करत आहे.
गाझा पट्टीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून हवाई हल्ले झालेले नाहीत. यामुळे येथे जनजीवन लवकरच पूर्वपदावर येईल, अशी आशा येथील लोकांना आहे. सयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेकडून गाझापट्टीत सातत्याने मदत पोहचवली जात आहे. आपण गाझातील पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी 29,494 किलो मानवी मदद पाठवल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.
इस्रायली सैन्यदलाचे प्रवक्ता डॅनियल हगरी यांनी युद्धविराम संपल्यानंतर पुन्हा युद्ध सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. बंधकांना युद्धविरामच्या माध्यमाने अथवा युद्ध करून देशान आणले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, इस्रायली सैन्यदलाच्या इतर अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनीही म्हटले आहे.
आम्ही हमासला उखडून टाकू -
भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन म्हणाले, 'युद्धविराम संपताच आम्ही पुन्हा आमच्या मिशनवर परतू. यानंतर आम्ही तेच करणार, जे आम्ही ठरवलेले आहे. आम्ही हमासला उखडून टाकू.' त्यांनी पुन्हा एकदा युद्ध सुरू करण्यासंदर्भात भाष्य केले आहे.
जेनिन शरणार्थी कँपमध्ये एका घरावर ड्रोन हल्ला -
अलजजीराने दिलेल्या वृत्तानुसार, वेस्ट बँकच्या जेनिन शरणार्थी कँपमध्ये एका घरावर ड्रोन हल्ला झाला आहे. याशिवया इस्रायलने शहरातून डझनावर लोकांना अटकही केली आहे. याशिवाय, जेनिनमध्ये बऱ्याच रुग्णालयांबाहेर इस्रायली सेन्यही उभे आहे. तसेच जखमी लोकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.