राष्ट्रगीत सुरु होते, तितक्यात पाऊस कोसळू लागला; मोदी भिजले पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 12:27 PM2023-06-22T12:27:06+5:302023-06-22T12:27:49+5:30
मोदींसाठी आज व्हाईट हाऊसमध्ये डीनर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला ४०० पाहुणे उपस्थित असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी आंतरराष्ट्रीय योग दिन विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी मोदी वॉशिंग्टनला पोहोचले आहेत. यावेळी मोदींचे राजकीय सन्मानात स्वागत करण्यात आले. परंतू, जसे मोदी विमानातून उतरले तसा पाऊस सुरु झाला. परंतू, तेव्हाच राष्ट्रगीत सुरु झाल्याने मोदींसह त्यांना सॅल्यूट देणाऱ्या अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी पावसातच भिजत उभे राहणे पसंत केले.
मोदींच्या स्वागतावेळी दोन्ही देशांची राष्ट्रगीते वाजविण्यात आली. मोदी सावधान अवस्थेत असताना पाऊस सुरु झाला, राष्ट्रगीतांच्या सन्मानासाठी मोदींसह तिथे उपस्थित सारे पावसात भिजत होते.
मोदींसाठी आज व्हाईट हाऊसमध्ये डीनर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला ४०० पाहुणे उपस्थित असणार आहेत. याचबरोबर मोदी आज अमेरिकी संसदेला संबोधित करणार आहेत.
नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना काही खास भेटवस्तू दिल्या. मोदी यांनी बायडन यांना दिलेल्या भेटवस्तूंचा थेट संबंध बायडेन यांच्या वयाशी आहे. पंतप्रधान मोदी यांनी बायडन यांना सहस्रचंद्र दर्शनासाठीच्या भेटवस्तू दिल्या आहेत. सहस्रचंद्र दर्शनावेळी गणेश पूजेची परंपरा आहे. त्यासाठी मोदींनी बायडेन यांना गणेशमूर्ती आणि एक दिवाही भेट दिला.