सिरियातील यादवी संपविण्यासाठी असद यांना सत्ता सोडावीच लागेल

By admin | Published: November 20, 2015 03:56 AM2015-11-20T03:56:52+5:302015-11-20T03:56:52+5:30

सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद सत्ता सोडेपर्यंत तेथील यादवी संपुष्टात येणार नाही. तेथील यादवी संपविण्यासाठी असद यांना सत्ता सोडावीच लागेल, असे अमेरिकेचे

Asad has to abolish the power of Assad to complete the Syrian warship | सिरियातील यादवी संपविण्यासाठी असद यांना सत्ता सोडावीच लागेल

सिरियातील यादवी संपविण्यासाठी असद यांना सत्ता सोडावीच लागेल

Next

ओबामा यांची स्पष्टोक्ती : शांततेच्या मार्गात त्यांचाच अडथळा

मनिला : सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद सत्ता सोडेपर्यंत तेथील यादवी संपुष्टात येणार नाही. तेथील यादवी संपविण्यासाठी असद यांना सत्ता सोडावीच लागेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केले आहे. येथील व्यापार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, सिरियात शांतता स्थापन होण्याच्या मार्गातील असद हेच मुख्य अडथळा आहेत. असद यांच्या राजवटीतच तेथे मोठ्या प्रमाणावर यादवी माजली असून, नागरिकांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना असद यांची सत्ता मान्य नाही.
अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य राष्ट्रे यांना असद नको आहेत, तर रशिया असद यांच्या बाजूने उतरला आहे. यामुळे हा वाद आणखी काही महिने तरी संपुष्टात येण्याची शक्यता नाही.

Web Title: Asad has to abolish the power of Assad to complete the Syrian warship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.