Afghanistan Taliban Crisis: देश सोडला नसता तर काबुलमध्ये रक्ताचे पाट वाहिले असते; अशरफ घनींनी दिले स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 09:50 AM2021-08-19T09:50:03+5:302021-08-19T09:53:10+5:30
Afghanistan Taliban Crisis: संयुक्त अरब अमिरातने (UAE) अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आश्रय दिल्याचे अधिकृतरित्या मान्य केले आहे.
अबूधाबी: अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यानंतर एकेक प्रांतावर ताबा घेत तालिबानने अफगाणिस्तावर पूर्ण ताबा मिळवला. तेथे तालिबानचे सरकार स्थापण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यातच तालिबान काबुलमध्ये शिरल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी पलायन केले. त्यानंतर अनेक दिवस ते नेमके कुठे आहेत, याचा शोध लागत नव्हता. अखेर संयुक्त अरब अमिरातने (UAE) अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आश्रय दिल्याचे अधिकृतरित्या मान्य केले आहे. यानंतर जगासमोर येत अशरफ घनी यांनी स्पष्टीकरण देत अफगाणिस्तान सोडले नसते, तर काबुलमध्ये रक्ताचे पाट वाहिले असते. तसेच माझ्यावर करण्यात येत असलेले आरोप चुकीचे आहेत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. (ashraf ghani denied allegations of he run away with full of cash after afghanistan taliban crisis)
तालिबानने भारतातून होणारी आयात-निर्यात रोखली; अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर निर्णय
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी पैशांच्या अनेक बॅगा घेऊन देशातून पळ काढल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. हे सर्व आरोप बिनबुडाचे असून, राजकीय हेतूने आणि छवी बिघडवण्यासाठी करण्यात आल्याचा पलटवार घनी यांनी केला आहे. काबूलमधील रशियन दुतावासाने घनी हे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आपल्या सोबत घेऊन गेल्याचा आरोप केला होता.
अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?
आरोप करणाऱ्यांना माझ्याविषयी माहिती नाही
फरार झाल्याचा आरोप करणाऱ्यांना माझ्याविषयी माहिती नाही. त्यांनी थेट निर्णय देऊ नये. तालिबानशी चर्चा करण्यात काहीही तथ्य नव्हते. कारण चर्चेतून कोणताही मार्ग निघाला नसता. मोठी हानी टाळण्यासाठी अफगाणिस्तान सोडला. सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घ्यावा लागला. सुरक्षा दलाच्या सल्ल्यानंतरच देश सोडला. अफगाणिस्तान सोडले नसते, तर काबुलमध्ये रक्ताचे पाट वाहिले असते, असे अशरफ घनी यांनी म्हटले आहे.
तालिबानचा धोका, अपहरणाची भीती अन् संपत आलेले इंधन; Air India च्या विमानाचा १ तास थरार
मानवतेच्या आधारावर आश्रय
राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आपल्या कुटुंबासह अबू धाबीमध्ये आहेत. संयुक्त अरब अमिराती (यूएई) च्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मानवतेच्या आधारावर UAE राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबाला आश्रय देत आहे, असे यूएईने म्हटले आहे. २० वर्षांच्या लढाईनंतर अखेर रविवारी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. देशात हिंसाचाराला सामोरे जावे लागू नये म्हणून अनेकांनी देश सोडला आहे.
“मला कठोर निर्णय घ्यावा लागला अन् मी देश सोडला”; अशरफ घनींचे देशवासीयांना भावुक पत्र
दरम्यान, एकीकडे देशातील सरकार कोसळत असताना दुसरीकडे घनी हे देशामधून पळून गेले. त्यांनी चार गाड्या भरुन रोख रक्कम नेली. हे सर्व पैसे हेलिकॉप्टरमध्ये भरण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो सर्व पैसा हेलिकॉप्टरमध्ये मावला नाही. त्यामुळे काही पैसा धावपट्टीवरच सोडून देण्यात आला, असा दावा रशियाचे अफगाणिस्तानमधील प्रवक्तांनी म्हटले होते. मात्र घनी यांनी हा दावा फेटाळून लावत. एक पारंपारिक कपड्यांचा जोड, एक कोट आणि घातलेल्या सॅण्डल एवढ्या तीन गोष्टी सोबत घेऊन मी देश सोडला, असे स्पष्टीकरण घनी यांनी दिले.