Afghanistan Taliban Crisis: “मी पुन्हा मायदेशात परत येईन, चर्चा सुरू आहे”; देश सोडल्यानंतर अशरफ घनींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 11:09 AM2021-08-19T11:09:36+5:302021-08-19T11:15:40+5:30

Afghanistan Taliban Crisis: जगासमोर येत अशरफ घनी यांनी आता आपण पुन्हा मायदेशी परतण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचे म्हटले आहे.

ashraf ghani says that he is in talks to return to afghanistan after taliban crisis | Afghanistan Taliban Crisis: “मी पुन्हा मायदेशात परत येईन, चर्चा सुरू आहे”; देश सोडल्यानंतर अशरफ घनींची प्रतिक्रिया

Afghanistan Taliban Crisis: “मी पुन्हा मायदेशात परत येईन, चर्चा सुरू आहे”; देश सोडल्यानंतर अशरफ घनींची प्रतिक्रिया

Next
ठळक मुद्देअशरफ घनी यांची आता पुन्हा मायदेशी परतण्यासंदर्भात चर्चाअफगाणी जतनेसमोरच राष्ट्राध्यक्षाला पुन्हा फासावर लटकवले असतेदेशामध्ये सरकारने सुरु केलेल्या वाटाघाटीच्या चर्चांना माझा पाठिंबा

अबूधाबी: अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यानंतर एकेक प्रांतावर ताबा घेत तालिबानने अफगाणिस्तावर पूर्ण ताबा मिळवला. तेथे तालिबानचे सरकार स्थापण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यातच तालिबान काबुलमध्ये शिरल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी पलायन केले. अखेर संयुक्त अरब अमिरातने (UAE) अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आश्रय दिल्याचे अधिकृतरित्या मान्य केले आहे. यानंतर जगासमोर येत अशरफ घनी यांनी आता आपण पुन्हा मायदेशी परतण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचे म्हटले आहे. (ashraf ghani says that he is in talks to return to afghanistan after taliban crisis)

देश सोडला नसता तर काबुलमध्ये रक्ताचे पाट वाहिले असते; अशरफ घनींनी दिले स्पष्टीकरण

तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये कब्जा मिळवल्यानंतर घनी यांनी देश सोडल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र आता आपण पुन्हा मायदेशी परतण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचे घनी म्हणाले आहेत. सध्या देशामध्ये सरकारने सुरु केलेल्या वाटाघाटीच्या चर्चांना माझा पाठिंबा आहे. आता अब्दुल्ला अब्दुल्ला आणि माझी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. ही चर्चा यशस्वी होणे गरजेचे आहे, असे घनी सांगितले. 

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

जनतेसमोर राष्ट्राध्यक्षाला फासावर लटकवले असते

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून पळून गेल्यानंतर पहिल्यांदाच समोर आले आहेत. मी एवढ्या तातडीने देश सोडला की मला माझ्या स्लिपर्स आणि बूट सोबत घेण्यासही वेळ मिळाला नाही. एक पारंपारिक कपड्यांचा जोड, एक कोट आणि घातलेल्या सॅण्डल एवढ्या तीन गोष्टी सोबत घेऊन मी देश सोडला. मी तिथेच थांबलो असतो तर अफगाणी जतनेच्या डोळ्यांसमोरच त्यांनी निवडून दिलेल्या राष्ट्राध्यक्षाला पुन्हा फासावर लटकवले असते, असे सांगत फेसबुकवरुन पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये घनी यांनी आपण देशामध्येच थांबलो असतो, तर आपली हत्या झाली असती अशी भीती व्यक्त केली. 

तालिबानचा धोका, अपहरणाची भीती अन् संपत आलेले इंधन; Air India च्या विमानाचा १ तास थरार

माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी पैशांच्या अनेक बॅगा घेऊन देशातून पळ काढल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. हे सर्व आरोप बिनबुडाचे असून, राजकीय हेतूने आणि छवी बिघडवण्यासाठी करण्यात आल्याचा पलटवार घनी यांनी केला आहे. काबुलमधील रशियन दुतावासाने घनी हे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आपल्या सोबत घेऊन गेल्याचा आरोप केला होता. फरार झाल्याचा आरोप करणाऱ्यांना माझ्याविषयी माहिती नाही. त्यांनी थेट निर्णय देऊ नये. तालिबानशी चर्चा करण्यात काहीही तथ्य नव्हते. कारण चर्चेतून कोणताही मार्ग निघाला नसता. मोठी हानी टाळण्यासाठी अफगाणिस्तान सोडला. सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घ्यावा लागला. सुरक्षा दलाच्या सल्ल्यानंतरच देश सोडला. अफगाणिस्तान सोडले नसते, तर काबुलमध्ये रक्ताचे पाट वाहिले असते, असे अशरफ घनी यांनी म्हटलेय. 

सॅल्यूट! अमरावतीच्या ‘नीरजा’चे धाडस; तालिबानच्या तावडीतून १२९ भारतीयांना मायदेशी आणले

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आपल्या कुटुंबासह अबू धाबीमध्ये आहेत. संयुक्त अरब अमिराती (यूएई) च्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मानवतेच्या आधारावर UAE राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबाला आश्रय देत आहे, असे यूएईने म्हटले आहे. २० वर्षांच्या लढाईनंतर अखेर रविवारी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. देशात हिंसाचाराला सामोरे जावे लागू नये म्हणून अनेकांनी देश सोडला आहे. 
 

Read in English

Web Title: ashraf ghani says that he is in talks to return to afghanistan after taliban crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.